शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान झेलेन्स्कींचे पत्नीसोबत 'वोग' मॅगझिनसाठी फोटोशूट! सोशल मीडियावर ट्रोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 20:29 IST

Volodymyr Zelenskyy : या फोटोंमध्ये झेलेन्स्की आपल्या पत्नीसोबत वेगवेगळ्या पोजमध्ये दिसत आहेत. एका फोटोत ओलेना युक्रेनियन सैनिकांसोबत दिसत आहेत. यावरून युजर्सनी त्यांना ट्रोल केले.

रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्ध सुरू होऊन जवळपास पाच महिने झाले आहेत. यादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपल्या पत्नीसमवेत  'वोग' (Vogue) मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेन युद्धाला पाच महिने झाले आहेत. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा कठीण प्रसंगामध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आपल्या देशातील लोकांच्या पाठीशी उभे राहिले. यासाठी त्यांनी देशातील जनतेची वाहवा मिळवली. पण, झेलेन्स्की यांच्या फोटोशूटच्या निर्णयामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, झेलेन्स्की यांनी वोग या फॅशन मॅगझिनसाठी युद्धाच्या विध्वंसाच्या फोटोमध्ये पोझ दिली आहे. यामध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की युक्रेनच्या फर्स्ट लेडी ओलेनासोबत दिसत आहेत. हे फोटो व्होग मॅगझिनच्या ऑनलाइन आवृत्तीसाठी घेण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये झेलेन्स्की आपल्या पत्नीसोबत वेगवेगळ्या पोजमध्ये दिसत आहेत. एका फोटोत ओलेना युक्रेनियन सैनिकांसोबत दिसत आहेत. यावरून युजर्सनी त्यांना ट्रोल केले.

दरम्यान, जेव्हा रशिया आणि युक्रेन यांच्यात लढाई सुरू झाली, तेव्हा झेलेन्स्की यांच्या धैर्याचे आणि शौर्याचे जगभर कौतुक होत होते. असे म्हटले जाते की, प्रसिद्ध व्यक्तीच्या मागे एका महिलेचा हात असतो. तसेच झेलेन्स्की यांच्या कडक वृत्तीच्या मागे त्यांची पत्नी ओलेना यांचा हात असतो. 44 वर्षीय ओलेना या एकेकाळी आपल्या पतीच्या राजकीय कारकिर्दीच्या विरोधात होत्या, परंतु नंतर प्रचारादरम्यान त्यांनी पतीला पाठिंबा दिला. झेलेन्स्की यांच्या गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात त्या युक्रेनच्या फर्स्ट लेडी म्हणून काम करत आहेत.

झेलेन्स्की आणि ओलेना एकाच शाळेत शिकले आहेत. ओलेना यांनी आर्किटेक्टचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी लेखनातही रस दाखवला आहे. असे म्हणतात की झेलेन्स्की हे राजकारणापूर्वी विनोदी कलाकार होते आणि त्यावेळी त्यांची पटकथा लेखक त्यांची पत्नी ओलेना होत्या. ओलेना या गेल्या अनेक दशकांपासून कधीही चर्चेत आल्या नाहीत. पण, कठीण काळात त्या केवळ आपल्या पतीचीच नव्हे तर युक्रेनमधील लोकांची भावना कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसल्या.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाSocial Mediaसोशल मीडिया