युद्धाच्या पार्श्वभूमूवर अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांत पार पडलेली ऐतिहासिक शांतता चर्चा पूर्णपणे अशयस्वी ठरली आहे. यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर चर्चा अपयशाचे खापर फोडले आहे. इराणने अमेरिकेच्या मागण्या 'अवास्तव' असल्याचे म्हटले आहे. तर अमेरिकेने इराणच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
का फिसकटली चर्चा? -या चर्चेसंदर्भात माहिती देताना इराणची सरकारी वृत्तवाहिनी IRIB ने टेलिग्रामवर म्हटले आहे, "इराणी लोकांच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी इराणी शिष्टमंडळाने २१ तास सातत्याने आणि जोरदारपणे चर्चा केली. इराणी शिष्टमंडळाने पूर्णपणे प्रयत्न करूनही, अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा पुढे सरकू शकली नाही आणि संपुष्टात आली."
काय म्हणाले अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हॉन्स? -तर दुसऱ्या बाजूला पत्रकारांशी बोलोताना अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे उपराष्ट्रपती जे.डी. वॅन्स म्हटले, "वाईट बातमी अशी आहे की, आमच्यात कोणताही करार होऊ शकलेला नाही. मला वाटते की, अमेरिकेपेक्षा इराणसाठीच ही अधिक वाईट बातमी आहे. त्यामुळे, कोणताही करार न करताच आम्ही अमेरिकेला परत जात आहोत. कारण त्यांनी (इराणने) आमच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे.
"अमेरिकेपेक्षाही इराणसाठी अधिक वाईट बातमी" - "वाटाघाटींमध्ये काहीही उणिवा राहिल्या असल्या, तरी त्याचे कारण पाकिस्तानी नक्कीच नाही. त्यांनी चांगलेच काम केले. इराम आणि अणेरिकेतील दुरावा संपावा यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. आम्ही गेल्या २१ तासांपासून या प्रक्रियेत आहोत. आम्ही इराणींशी अनेक महत्त्वपूर्ण चर्चा केल्या आहेत. ही चांगली बातमी आहे. आम्ही अद्याप कोणत्याही करारापर्यंत पोहोचू शकलो नाही. अमेरिकेसाठी ही जितकी वाईट बातमी आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक ती इराणसाठी वाईट बातमी आहे. कोणताही करार न करताच आम्ही आता अमेरिकेला परत जात आहोत. त्यांनी आमच्या अटी स्वीकारलेल्या नाहीत," असे व्हान्स यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिका व इराणच्या शिष्टमंडळाचे पाकिस्तानमध्ये आगमन झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली होती.
Web Summary : US-Iran peace talks in Islamabad failed. Iran blames US demands, calling them unrealistic. The US criticizes Iran's stance, leading to no agreement. Vows says it is worse for Iran.
Web Summary : इस्लामाबाद में अमेरिका-ईरान की शांति वार्ता विफल रही। ईरान ने अमेरिकी मांगों को अवास्तविक बताया, अमेरिका ने ईरान की आलोचना की। कोई समझौता नहीं हो सका। वेंस ने कहा कि यह ईरान के लिए ज्यादा बुरा है।