शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

‘तेजस’ला अमेरिकेची शक्ती; जीई एअरोस्पेससोबत करार; भारतात उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 07:04 IST

हा पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील मैलाचा दगड मानला जात आहे.

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात दोन्ही देशांत मोठे करार होण्याची अपेक्षा खरी ठरली. गुरुवारी अमेरिकेच्या जीई एअरोस्पेसने हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडसोबत (एचएएल) भारतीय हवाई दलातील हलके लढाऊ तेजस जेट विमानाचे इंजिन भारतात संयुक्तरीत्या उत्पादन करण्यासाठी करार केला. हा पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील मैलाचा दगड मानला जात आहे.‘या करारामध्ये जीई एअरोस्पेसच्या एफ ४१४ इंजिनांचे भारतात संयुक्त उत्पादन करण्याची शक्यता समाविष्ट आहे. दरम्यान, दाेन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य बळकट करण्याच्या दिशेने हा करार महत्त्वाचा मानला जात आहे. (वृत्तसंस्था)

‘रीपर ड्राेन’मुळे वाढेल भारताची ताकदभारत जनरल ॲटॉमिक्स एमक्यू-९ ‘रीपर’ सशस्त्र ड्रोन खरेदी करणार असून नरेंद्र मोदी आणि जो बायडेन याबाबतचा करार जाहीर करणार आहेत. यामुळे भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि हिंदी महासागरात पाळत ठेवण्याची क्षमता तर वाढेलच, पण चीनच्या सीमेवरही ते प्रभावी ठरेल.

रीपरची वैशिष्ट्येहे ड्रोन ५००% अधिक भार वाहून नेऊ शकते आणि आधीच्या एमक्यू-१ प्रिडेटरपेक्षा नऊपट अधिक अश्वशक्तीचे आहे. नवे ड्रोन दीर्घकाळ तग धरून सतत पाळत ठेवू शकतात. ‘रीपर’ ड्रोन ५०,००० फूट उंचीवर २४० नॉट्समध्ये २७ तास काम करू शकते आणि त्याची भारवाहन क्षमता १७४६ किलो आहे.

‘व्हाइट हाऊस’मध्ये ‘माेदी-माेदी’ जयघाेषपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘व्हाइट हाउस’मध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. रिमझिम पावसात व्हाइट हाउसच्या दक्षिण लॉनवर माेठ्या संख्येने जमलेल्या भारतीय समुदायाने ‘मोदी मोदी’च्या घोषणा सुरू करताच बायडेन मोदींना म्हणाले, ‘व्हाइट हाउसमध्ये परत आपले स्वागत आहे.’ 

लोकशाही डीएनएमध्येच, भेदभावाला जागा नाहीअल्पसंख्याकांच्या अधिकाराबद्दल कोणी विचारले तर मला आश्चर्य वाटते. कारण, भारतात लोकशाही आहे व सरकार लोकशाही मूल्यानुसारच चालते. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्यावर भारताचा विश्वास आहे. जात-पात, पंथ, धर्म वा लिंग या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही, कारण आमच्या डीएनएमध्येच लोकशाही आहे. भारत- अमेरिका दहशतवादाविरोधातील लढाईत खांद्याला खादा लावून उभे आहेत.     - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मोदी यांच्या भेटीने नवे मार्ग प्रशस्त झालेवृत्तपत्र स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, सहिष्णुता, विविधतेत एकता.... भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. मोदी यांच्याशी याआधीही भेट झाली आहे. आताच्या त्यांच्या भेटीने सहकार्याचे नवे मार्ग प्रशस्त झाले आहेत. आम्ही दोघेही स्पष्टवक्ते आहोत आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करतो. जशी भारताच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे, तशीच ती अमेरिकेच्याही आहे.    - जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

टॅग्स :AmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडन