शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचा महाभयंकर पलटवार; इराणच्या १७ युद्धनौका उद्ध्वस्त, २००० तळांवर बॉम्बवर्षाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 08:26 IST

इराणने डागलेली ५०० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि २००० ड्रोनचा हल्ला अमेरिकेने केवळ रोखलाच नाही, तर त्याहीपेक्षा भीषण पलटवार केला आहे.

मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये सध्या युद्धाचा वणवा पेटला असून, अमेरिका आणि इराण समोरासमोर आले आहेत. इराणने डागलेली ५०० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि २००० ड्रोनचा हल्ला अमेरिकेने केवळ रोखलाच नाही, तर त्याहीपेक्षा भीषण पलटवार करत इराणचे कंबरडे मोडले आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत इराणच्या १७ युद्धनौका आणि पाणबुड्या समुद्रातच गाडल्या गेल्या असून, त्यांच्या २००० हून अधिक लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

इराणची 'ती' चूक आणि अमेरिकेचा महाप्रहार

इराणने इस्रायल आणि अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यासाठी आपल्या भात्यातील सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र, अमेरिकन लष्कराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे सर्व हल्ले हवेतच नष्ट केले. यानंतर खवळलेल्या अमेरिकेने इराणच्या अंतर्गत भागात घुसून हल्ले चढवले. अमेरिकन सेंट्रल कमांडचे अधिकारी ब्रॅड कूपर यांनी दावा केला आहे की, "आज अरबी समुद्र, होर्मुजची सामुद्रधुनी किंवा ओमानच्या उपसागरात इराणचे एकही जहाज शिल्लक राहिलेले नाही. आम्ही त्यांचे नौदल पूर्णपणे निकामी केले आहे."

खामेनींच्या मृत्यूनंतर इराण पेटला, पण...

या युद्धातील सर्वात मोठी खळबळजनक बातमी म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला आहे. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या भीषण संघर्षात इराणला मोठे नेतृत्व गमवावे लागले आहे. यामुळे इराणने आता 'आरपार'ची लढाई पुकारली असून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आमच्या निशाण्यावर असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, दुसरीकडे इस्रायली हवाई दलाने इराणच्या एअर डिफेन्स सिस्टिमवर एकामागून एक हल्ले करून त्यांची सुरक्षा यंत्रणा खिळखिळी केली आहे.

होर्मुजच्या समुद्रात जहाजांच्या रांगा, दहशतीचे वातावरण

युद्धाच्या या भडक्यामुळे जागतिक व्यापाराचा मार्ग असलेल्या होर्मुजमध्ये सध्या भयाण शांतता आहे. जगातील विविध देशांची जहाजे तिथे थांबून आहेत, मात्र कोणाचीही पुढे जाण्याची हिंमत होत नाहीये. इराणकडून कधीही हल्ला होऊ शकतो, या भीतीने जहाजांवरील कर्मचारी धास्तावलेले आहेत. समुद्रात इराणचे १७ जहाजं उद्ध्वस्त झाल्याने सर्वत्र आगीचे लोट आणि ढिगारे दिसत आहेत.

ट्रम्प यांचा कडक इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईचे समर्थन केले आहे. "मी जे केले, त्याबद्दल माझे कौतुक होत आहे. इराणवरील हे हल्ले अजून काही दिवस सुरूच राहतील," असे स्पष्ट संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. अमेरिकेच्या मते, इराणची हल्ला करण्याची क्षमता आता कमालीची घटली असून, अमेरिकन सैन्याची ताकद मात्र दुप्पट झाली आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता आखाती देशांकडे लागले असून, पुढील काही तास इराणच्या अस्तित्वासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : US Retaliates: Destroys 17 Iranian Warships, Bombs 2000 Bases!

Web Summary : America retaliated fiercely against Iran's attacks, destroying 17 warships and bombing over 2000 military bases. The conflict escalated after Iran's initial strikes, leading to significant losses for Iran, including key leaders. Global trade routes are disrupted, and tensions remain high as the US signals continued action.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायलwarयुद्ध