शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
2
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
3
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
4
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
5
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
6
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
7
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
8
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
9
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
10
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
11
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
12
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
13
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
14
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
15
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
16
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
17
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
18
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
19
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
20
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद

मीडिया टायकून रूपर्ट मर्डोक ९२ व्या वर्षी पाचव्यांदा चढणार बोहल्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 13:11 IST

प्रसिद्ध मीडिया टायकून रूपर्ट मर्डोक वयाच्या ९२ व्या वर्षी पाचव्यांदा लग्न करणार आहेत.

Media Tycoon Rupert Murdoch: प्रेम आंधळं असतं, प्रेमात वयाला मर्यादा नसते असं नेहमी बोललं जातं. आता याचा प्रत्यय देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. कारण प्रसिद्ध मीडिया टायकून रूपर्ट मर्डोक वयाच्या ९२ व्या वर्षी पाचव्यांदा लग्न करणार आहेत. येत्या जूनमध्ये ते इलेना झुकोवा यांच्याशी विवाह करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. खरं तर या आधी मर्डोक यांनी चार वेळा लग्न केलं असून, त्यांची होणारी पत्नी इलेना या एक निवृत्त शास्त्रज्ञ आहेत. रूपर्ट मर्डोक यांची ही सहावी एंगेजमेंट आहे. त्यांच्या भावी पत्नीचे वय ६७ वर्ष आहे. 

माहितीनुसार, त्यांचे लग्न कॅलिफोर्नियातील त्यांच्या मोरागा व्हाइनयार्डमध्ये होणार आहे. यासंबंधीची निमंत्रणं यापूर्वीच पाठवण्यात आली आहेत. मर्डोक यांचं यापूर्वी चार वेळा लग्न झालं आहे. लक्षणीय बाब म्हणजे मर्डोक यांची होणाऱ्या पत्नीशी भेट ही त्यांची तिसरी पत्नी वेंडी डेंग यांनी आयोजित केलेल्या एका मोठ्या कौटुंबिक सोहळ्यात झाली होती. १४ वर्षांच्या नात्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी तिसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला.

रूपर्ट मर्डोक पाचव्यांदा करणार लग्न इलेना झुकोवा यांना ४२ वर्षांची एक मुलगी देखील आहे, जी रशियन-अमेरिकन कला संग्राहक म्हणून कार्य करते. इलेना यांचं पहिलं लग्न प्रीमिअर लीग फुटबॉल क्लब चेल्सीचे माजी मालक रोमन अब्रामोविच यांच्याशी झालं होतं. मर्डोक यांच्या एगेंजमेंटची बातमी त्यांनी आपल्या मीडिया साम्राज्यातून पायउतार होत असल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत आली.

रूपर्ट मर्डोक यांची कंपनी न्यूज कॉर्पकडे शेकडो स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय डिजिटल न्यूज आउटलेटची मालकी आहे, ज्यात वॉल स्ट्रीट जर्नल, फॉक्स न्यूज आणि स्काय न्यूज ऑस्ट्रेलिया, तसेच पुस्तक प्रकाशक हार्परकॉलिन्स यांचा समावेश आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार त्यांची संपत्ती ८.९६ अब्ज आहे. तसेच न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, मर्डोक यांची होणारी पत्नी यापूर्वी लॉस एंजेलिसमध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठात आण्विक मधुमेह तज्ञ म्हणून काम करत होती. ती मूळची रशियाची आहे.

टॅग्स :marriageलग्नAmericaअमेरिकाrussiaरशिया