शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

उणे २०-३० अंश सेल्सियस तापमानात अमेरिकन नागरिक शिट्ट्या वाजवत रस्त्यावर येतात, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 07:18 IST

‘आईस’च्या भीतीने घरात कोंडल्या गेलेल्या स्थलांतरितांना मदत करण्यासाठी अमेरिकन नागरिकांनी चळवळ सुरू केली आहे.

प्राजक्ता पाडगांवकर, भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक, अटलांटा

अमेरिकेत सध्या सगळेच भीषण सुरू असल्यासारखे वाटत असले तरी इथे आनंददायी, आशादायीदेखील काही फुलून येते आहेच. ही गोष्ट आहे मिनेसोटा राज्यातल्या धीरोदात्त नागरिकांची. इथे दोन जुळी शहरं आहेत, सेंट पॉल आणि मिन्निआपोलीस. अनेक महिने इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आईस) या शहरात तळ ठोकून बसले आहे. विरोधक सत्तेवर असलेल्या राज्यात जाऊन अराजक, भय, आणि हिंसाचार पसरवणे हा अंतस्थ हेतू. बेकायदा रहिवाशांना शोधून शोधून टिपणे हे मुख्य काम. या देशविरोधी असंविधानात्मक कृत्याला, मिनेसोटाचे रहिवासी सडेतोड उत्तर देतात. या जन-चळवळीला एक नवा बाज आहे. इथली मंडळी अनोख्या पद्धतीने ‘आईस’च्या कारवाईला विरोध करताना दिसतात. इथले जागरूक नागरिक प्रत्येक असंवैधानिक कृतीची नोंद ठेवत आहेत. फोनमधील व्हिडीओ रेकॉर्डिंगमार्फत याबाबतची जनजागृती पसरवत आहेत. ‘सिग्नल’सारख्या सामाजिक माध्यमांद्वारे नागरिक संरक्षक गट निर्माण करून, अहोरात्र वस्त्यांमधून गस्त घालत आहेत. 

अनेकांनी कर्कश आवाज करणाऱ्या शिट्ट्या सोबत बाळगल्या आहेत. रस्त्याने जाताना जर ‘आईस’चे लोक दिसले तर शिट्टी/गाडीचा हॉर्न वाजवून ते सभोवतालच्या नागरिकांना सतर्क करतात. मुलांच्या शाळेच्या बस येण्या-जाण्याच्या मार्गांवर उभे राहून मुलांचे रक्षण करतात. एकत्र येऊन अनेक कलाकारांनी ‘आईस’विरोधी गाणी, भजने तयार केली आहेत. लोक रस्त्यांवर ही गाणी गात विरोध दर्शवतात. जिथे ‘आईस’ अधिकारी हॉटेलवर विश्रांतीसाठी जातात, तिथे जाऊन लोक जोरात ड्रम वाजवतात, फटाके फोडतात. मोर्चे, घोषणा, रोजच अव्याहत सुरू आहेत. यात अहिंसा न सोडता मंडळी स्वतःच्या शेजारी राहणाऱ्या लोकांसाठी रस्त्यावर उतरली  आहेत. एका वृद्ध संगोपन संस्थेतील वृद्ध, त्यांचे डॉक्टर, नर्स आणि वकील एकत्रितपणे ‘आईस’च्या कार्यालयात धरणे धरून बसली होती. 

या शहरांमधल्या शाळा सध्या बंद आहेत, अथवा ऑनलाइन सुरू आहेत. शिक्षक मुलांच्या मनातील अनिश्चितता, भय, यावर काय तोडगा काढता येईल, याचा विचार करत आहेत. ‘आईस’चे अधिकारी नागरिकांना  काही तास, अथवा दिवस, तुरुंगात डांबून हिवाळ्यात अनवाणी पायाने नेसत्या वस्त्रानिशी रस्त्यावर सोडून देत असल्याचे समजताच, काही वकील आणि सेवाभावी संस्थांनी तुरुंगाबाहेर थांबून लोकांना गरम कपडे, बूट देणे सुरू केले आहे. अनेक छोटे व्यवसाय यात होरपळून निघत आहेत, त्यांना आधार म्हणून शेजारपाजारच्या लोकांनी तिथे आवर्जून काही विकत घेणे सुरू केले आहे. अपुरी कागदपत्रे असलेले / नसलेले स्थलांतरित ‘आईस’च्या भीतीने घराबाहेर पडू शकत नाहीत. अशा कुटुंबांसाठी अमेरिकन नागरिक जेवण आणि वाण सामानाची व्यवस्था करत आहेत. इथले आदिवासी, त्यांची पारंपरिक नृत्ये करून विरोध दर्शवत आहेत. हा सगळा विरोध सुरू आहे ते एकमेकांच्या शेजाऱ्यांना सुरक्षित आणि एकीने राहता यावे याकरिता. अशा या अनोख्या नव्या असहकार चळवळीला नाव दिले गेले आहे ‘नेबरीझम’ अर्थात ‘शेजारधर्म’. उणे २०-३० अंश सेल्सियस तापमानात रस्त्यावर उतरून दंडेलशाहीचा विरोध करत असलेल्या या शहरांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस ‘नेशन’ या मासिकाने केली आहे.    praj.padgaonkar@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Americans protest ICE in freezing temperatures, showing neighborhood solidarity.

Web Summary : Minnesota residents resist ICE through 'Neighborism,' protecting immigrants. They use whistles, protests, and community support, ensuring safety and unity. Despite school closures and fear, locals provide essentials, legal aid, and unwavering solidarity.
टॅग्स :Americaअमेरिका