शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Coronavirus: मला कोरोना झालाय; विमान उड्डाणावेळी 'तो' अचानक ओरडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 15:59 IST

Coronavirus विमानातील प्रवाशांची घाबरगुंडी; कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली

ठळक मुद्देविमानातील प्रवाशांची घाबरगुंडी; कर्मचाऱ्यांची तारांबळ उडालीडल्लासवरुन नॅशविलेला जाणाऱ्या विमानाला आठ तास विलंबकोरोना झाल्याचा दावा करणाऱ्या प्रवाशाचा सुरुवातीला विमानातून उतरण्यास नकार

डल्लास: सध्या जगभरात कोरोनाची दहशत पाहायला मिळतेय. आसपासच्या व्यक्तीला खोकला, शिंक आली तरी सगळीकडे त्याच्याकडे संशयानं पाहू लागतात. एका बाजूला कित्येक जणांनी कोरोनाची धास्ती घेतली असताना दुसरीकडे काही जण अद्यापही याकडे गांभीर्यानं पाहण्यास तयार नाहीत. उलट कोरोनाच्या नावाखाली टिंगल टवाळ्या सुरू आहेत. याचा फटका इतरांना मोठ्या प्रमाणात बसतोय. अमेरिकेच्या डल्लासवरुन नॅशविलेला जाणाऱ्या प्रवाशांना अशाच एका व्यक्तीमुळे मनस्ताप सहन करावा लागला. अमेरिकन एअरलाईन्सचं विमान डल्लासवरुन नॅशविलेला जात होतं. त्यावेळी एका प्रवाशानं त्याला कोरोनाची बाधा झाल्याचा दावा केला. त्यामुळे इतर प्रवासी प्रचंड घाबरले. तर दुसरीकडे विमानातील आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. यानंतर विमानतळावरील पोलिसांनी विमानात प्रवेश केला. त्यांनी कोरोना झाल्याचा दावा करणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेतलं. विमानातल्या कोरोना नाट्यामुळे विमानाच्या उड्डाणाला तब्बल आठ तास उशीर झाला. कोरोना झाल्याचा दावा करणाऱ्या प्रवाशानं सुरुवातीला विमानातून उतरण्यास नकार दिला. त्यामुळे विमानातील कर्मचाऱ्यांनी काम करण्यास असमर्थतता दर्शवली. तर इतर प्रवाशांचा गोंधळ उडाला. 'नेमकं काय झालं होतं, कोणालाही कळत नव्हतं. तो माणूस फक्त आजारी होता की त्याला खरंच कोरोना झाला होता, याची कल्पना नसल्याचं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती,' अशी माहिती विमानात उपस्थित असलेल्या एका प्रवाशानं दिली. कोरोना झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी विमानातून खाली उतरवलं. यानंतर काही वेळानं पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती विमानातल्या प्रवाशांना दिली. 'त्या व्यक्तीची चौकशी करण्यात आली असून चिंतेचं काही कारण नाही. चेष्टा करण्यासाठी त्यानं कोरोना झाल्याचा दावा केला. खुद्द त्या व्यक्तीनंच चौकशीत आम्हाला ही माहिती दिली,' असं पोलिसांनी विमानातल्या प्रवाशांना सांगितलं. यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.  

टॅग्स :corona virusकोरोना