शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

अमेरिकेकडून इलेक्ट्रॉनिक रायफलचं यशस्वी परीक्षण; लक्ष्याची खात्री पटवून करणार नेस्तनाबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 17:58 IST

या दुर्बीण प्रणालीद्वारे रायफल शूटिंगद्वारे किंवा लक्ष्य अचूकपणे टिपणार असून, गोळीबाराची सूचना देणार आहे. 

वॉशिंग्टनः सीरियामध्ये तैनात असलेले अमेरिकन सैन्यानं इलेक्ट्रॉनिक रायफल दुर्बिणीची यशस्वी चाचणी घेतली आहे. या चाचणीत इलेक्ट्रॉनिक रायफल लक्ष्याची खात्री पटल्यानंतरच गोळीबार करून त्याला उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहे. लायनेक्स आधारित लक्ष्यीत प्रणालीसह सुसज्ज या रायफल दुर्बिणीला स्मॅश 2000 असे नाव देण्यात आले आहे. या दुर्बीण प्रणालीद्वारे रायफल शूटिंगद्वारे किंवा लक्ष्य अचूकपणे टिपणार असून, गोळीबाराची सूचना देणार आहे. ही रायफल लक्ष्य निश्चित झाल्यानंतरच सैन्याला गोळीबार करण्याची परवानगी देते. लक्ष्य टप्प्यात नसल्यास ट्रिगर दाबलं गेल्यासही दुर्बिणीद्वारे कार्यान्वित यंत्रणा रायफलमधून गोळी सोडण्यास परवानगी देत ​​नाही. असे सांगितले जात आहे की, याद्वारे हवेत 400 फुटांपर्यंत वेगाने फिरणारे लहान लक्ष्यदेखील पूर्ण अचूकतेने भेदता येऊ शकते.जॉर्डन-इराक सीमेजवळील अल्ताफ तळावर अमेरिकन सैनिक आकाशात ड्रोनद्वारे टांगलेल्या लक्ष्याला भेदण्यासाठी या दुर्बीण प्रणालीचा तीव्रपणे वापर करत आहेत. जरी इस्रायली सैन्याने अमेरिकेपूर्वी मैदानी चाचण्या घेतल्या आहेत, परंतु सीरियामध्ये प्रथमच त्याचा उपयोग होत आहे. असं म्हणतात की, अमेरिकन सैन्याने युद्धाच्या परिस्थितीसाठी ही दुर्बिणीची यंत्रणा विकत घेतली आहे. परंतु ती कोणत्या लष्करी कारवाईसाठी वापरणार हे अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. परंतु सैन्याने जाहीर केलेली छायाचित्रे हे ड्रोन कारवायांविरुद्ध अधिक उपयुक्त असल्याचे सिद्ध होऊ शकते.पाळत ठेवून देखील व्हिडीओ रेकॉर्डिंगया यंत्रणेत पाळत ठेवणार्‍या उपकरणासह व्हिडीओ रेकॉर्डरचा वापर केला जाऊ शकतो. टेलिस्कोप निर्मात्या इस्त्रायली कंपनी असलेल्या स्मार्ट शूटरच्या म्हणण्यानुसार, वेगवान-गतिमान लहान लक्ष्य पकडण्यासाठी त्यामध्ये ड्रोन मोड देण्यात आलं आहे. अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन्स कमांडने मागील वर्षी प्रारंभिक चाचणीसाठी 98 टेलिस्कोप सिस्टम खरेदी केल्या होत्या.