शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
3
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
4
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
5
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
6
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
7
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
8
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
9
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
10
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
11
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
12
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
13
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
14
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
15
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
16
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
17
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
18
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
19
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
20
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
Daily Top 2Weekly Top 5

G-20 मध्ये अमेरिका एकटा पडला; भारतासह अनेक देशांनी 'त्या' प्रस्तावाला केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 14:03 IST

G-20 परिषदेत अमेरिकेने रशियाविरोधात प्रस्ताव मांडला, पण अनेक देशांनी विरोध केला.

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धावरून जगातील देश दोन भागात विभागले गेले आहेत. याचा प्रत्यय इंडोनेशियातील बाली येथे सुरू असलेल्या G-20 परिषदेतही पाहायला मिळत आहे. अमेरिका, रशिया, चीन यांसारखे मोठे देशही या शिखर परिषदेत सामील आहेत. या शिखर परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात रशियावर टीका करण्याचा प्रस्ताव पाश्चिमात्य देशांनी ठेवला होता, तो फोल ठरताना दिसत आहे. 

अनेक देशांचा प्रस्तावाला विरोधभारतासह चीन, रशिया, ब्राझील, सौदी अरेबिया आणि यजमान इंडोनेशियाने या प्रस्तावाचा निषेध केला आहे. रशियाचा निषेध करण्यासाठी अमेरिका, युरोपसह अनेक पाश्चिमात्य देशांतून ठराव आणले गेले. सध्या G-20 शिखर परिषदेच्या अंतिम घोषणेबाबत चर्चा सुरू आहे. मात्र भारत, चीन, इंडोनेशिया या देशांनी रशियाला पाठिंबा देताना प्रस्तावाला विरोध केला आहे.

भारतासह अनेक देशांचा रशियाला पाठिंबाया संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांचे म्हणणे आहे की, इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. रशियाविरुद्ध अशी निंदनीय आणि कठोर भाषा वापरू नये, असे आवाहन त्यांनी पाश्चात्य देशांना केले आहे. युक्रेनमधील रशियाच्या हल्ल्याबाबत पाश्चात्य देश आणि भारत, इंडोनेशिया, चीन या आशियाई देशांमध्ये मतभेद आहेत. इतकेच नाही तर गेल्या काही महिन्यांपासून सौदी अरेबिया रशियाच्या बाजूने जाताना दिसत आहे. सौदी अरेबियाने रशियासोबत तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर अमेरिकेकडून याला विरोध होत आहे.

पीएम नरेंद्र मोदी काय म्हणाले?रशियाला अनेक बड्या देशांकडून सातत्याने पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर अमेरिकेला आता केवळ युरोपीय देशांचा पाठिंबा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या G20 शिखर परिषदेला उपस्थित नसून, त्यांच्या जागी परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आहेत. विशेष म्हणजे आज G-20 शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शांततेचे आवाहन केले आहे. तसेच, दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एवढे मोठे संकट आले आहे. युक्रेनचा प्रश्न राजनैतिक मार्गाने सोडवावा लागेल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडनRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया