शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या खांबात शिरलं विमान, 90 हजार घरांची 'बत्ती गुल'; पोलिसांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 11:47 IST

या प्लेन क्रॅशमुळे संपूर्ण मॉन्टगोमेरी काउंटीमधील तब्बल 90 हजार घरे आणि दुकानांतील वीज गूल झाली आहे. याचाच अर्थ काउंटीतील एकूण एकचतुर्थांश लोक वीज संकटाचा सामना करत आहेत.

अमेरिकेतील मॅरीलँडमध्ये रविवारी रात्री एक छोटे विमान विजेच्या खांबात शिरले. यामुळे हजारो घरांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ही घटना मॉन्टगोमेरी काउंटीमध्ये घडली आहे. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहाणी झाल्याचे वृत्त नाही. दोन लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. वॉशिंग्टन पोस्टने स्थानीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

या प्लेन क्रॅशमुळे संपूर्ण मॉन्टगोमेरी काउंटीमधील तब्बल 90 हजार घरे आणि दुकानांतील वीज गूल झाली आहे. याचाच अर्थ काउंटीतील एकूण एकचतुर्थांश लोक वीज संकटाचा सामना करत आहेत. यासंदर्भात मॉन्टगोमेरी काउंटीच्या पोलिसांनी ट्विट करत म्हटले आहे, 'रोथबरी डॉ अण्ड गोशेन आरडी परिसरात एक छोटे विमान विजेच्या खांबाला धडकले यामुळे काउंटीतील वीज गुल झाली आहे. @Mcfrs घटनास्थळी आहे. या परिसरापासून दूर राहा, कारण येथे मोठ्या प्रमाणावर विजेच्या तारा आहेत. यांत वीज पुरवठा सुरू आहे.'

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, सिंगल इंजिन असलेले, मूने M20J विमान रविवारी सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी (स्थानिक वेळेनुसार) विजेच्या खांबाला धडकले आणि त्यातच अडकले. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहेत. यात विमान विजेच्या खांबावर साधारणपणे 100 फूट उंचावर अडकलेले दिसत आहे. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे वातावरण होते. हे विमान कमर्शिअल एरिया जवळ क्रॅश झाले. मात्र, अद्याप हा अपघात कशामुळे झाला हे समजू शकले नाही.

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाairplaneविमान