शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशातील स्थितीवर अमेरिकेने हस्तक्षेप करावा; भारतीय अमेरिकींच्या संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 08:36 IST

या दडपशाहीला आणि यामुळे होत असलेल्या विस्थापनाला आवर घालावी, फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडिज संघटनेची मागणी

नवी दिल्ली - भारतीय-अमेरिकींच्या सदस्यांची संघटना असलेल्या एका संघटनेने बांगला देशात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हस्तक्षेप करावा आणि याची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. भारताच्या शेजारी देशाचे आता कट्टरवादी देशात रूपांतर होत असल्याची शंकाही या संघटनेने उपस्थित केली आहे.

बांगला देशात चिन्मय कृष्णदास यांना झालेली अटक आणि अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर बायडेन आणि ट्रम्प यांनी दखल घेऊन हस्तक्षेप करावा, अशी मागणी ‘एफआयआयडीस’ (फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडिज) या संघटनेचे अध्यक्ष खंडेराव कंद यांनी पत्र लिहून केली आहे. कंद यांनी म्हटले आहे की, या दडपशाहीला आणि यामुळे होत असलेल्या विस्थापनाला आवर घालावी.

इस्काॅनवर निर्बंधास काेर्टाचा नकारबांगला देशात इस्काॅनवर निर्बंध लागू करण्यास येथील उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. न्यायालयाने स्वत:हून दखल घेत ही कारवाई करावी, अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होती. तत्पूर्वी सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती पावले उचलली असल्याचे प्रशासनामार्फत न्यायालयास कळवण्यात आले होते.

घटना चिंताजनक : थरूरबांगला देशातील स्थिती पाहता परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी ११ डिसेंबर रोजी या देशातील परिस्थितीविषयी संसदेच्या स्थायी समितीला अहवाल सादर करतील, असे समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी म्हटले आहे. बांगला देशातील घटना चिंताजनक असल्याचे थरूर यांनी नमूद केले.

कोलकात्यात निदर्शनेहिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी कोलकात्यात बांगला देशाच्या उप-उच्चायुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. तेथील आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेलाही विरोध केला. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशAmericaअमेरिकाIndiaभारत