शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

टाइम ट्रॅव्हलर सैनिकाने 2001 मध्येच केली होती महामारीची भविष्यवाणी; सांगितला 'जगाचा अंत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 08:31 IST

त्यांचे भीतीदायक दावे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बिजिंगमधील 2008 चे ऑलिम्पिक काही कारणास्तव रद्द केले जाईल. एक महामारी अमेरिकेला प्रभावित करेल आणि ती 2036 पर्यंत सुरू राहील.

वॉशिंग्टन - टाइम ट्रॅव्हलिंग सारख्या गोष्टी आपण चित्रपटांतून अथवा काल्पनिक कथांमधून ऐकल्या आहेत. मात्र, एका व्यक्तीने याच्या वास्तविकतेचा दावा केला आहे. ही व्यक्ती स्वतःला भविष्यातून आलेला एक टाइम ट्रॅव्हलर सांगत आहे. एवढेच नाही, तर तो जगाच्या अंताची भविष्यवाणीही करत होता. आपले नाव John Titor सांगणाऱ्या या व्यक्तीने 2000 आणि 2001 मध्ये भविष्यासंदर्भात अनेक दावे केले होते आणि मानवी जीवनाच्या उलट्या गिनतीला सुरुवात झाली असल्याचे म्हटले होते.

ही कहाणी एखाद्या चित्रपट पटकथालेखकांना आवडू शकते. टायटरने इंटरनेटवर दावा केला, की तो 2036 पासूनचा एक अमेरिकन सैनिक आहे, जो फ्लोरिडाच्या टाँपा येथून आला आहे. त्याने म्हटले आहे, की त्याला एका सरकारी टाइम ट्रॅव्हलची जबाबदारी देण्यात आली होती आणि 1975 मधून आयबीएम 5100 संगणक आणण्यासाठी पाठविले होते. टायटर म्हणाले, की "या मिशनसाठी विशेषत्वाने माझी निवड करण्यात आली आहे. कारण माझे आजोबा 5100 कंप्यूटरची प्रोग्रॅमिंग आणि असेंबलिंगमध्ये सहभागी होते.'

कंप्यूटर बगमुळे होईल जगाचा अंत -टायटरने म्हटले आहे, की 2000 मध्ये त्याने 'वैयक्तीक कारणास्तव' काही वेळ थांबण्याचा आणि भीतीदायक भविष्यवाणी करण्याचा निर्णय घेतला. त्याने अमेरिकेत गृह युद्ध आणि सीमांवर संघर्ष, लोकसंख्या स्फोटा सारख्या कारणांमुळे मृत्यूंचा दावा केला आहे. याशिवाय, 2015 मध्ये अमेरिका आणि रशियादरम्यान तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली होती, पण ती खोटी ठरली. टायटरचा सर्वात मोठा दावा, एका कंप्यूटर बगने जग नष्ट होण्याचा होता. 

त्यांचे भीतीदायक दावे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बिजिंगमधील 2008 चे ऑलिम्पिक काही कारणास्तव रद्द केले जाईल. एक महामारी अमेरिकेला प्रभावित करेल आणि ती 2036 पर्यंत सुरू राहील. टायटर यांनी मार्च 2001मध्ये शेवटची इंटरनेट पोस्ट केली. यानंतर ते कायमचेच बेपत्ता झाले. त्याच्या शेवटच्या पोस्टमध्ये, त्यांनी सुचवले होते, की प्रत्येकाने नेहमीच आपल्या कारमध्ये गॅसची कॅन ठेवायला हवी, ती रस्त्यात अचानकपणे गाडीत बिघाड झाल्यास कामी येऊ शकते.

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाSoldierसैनिक