पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोटमधील जनतेने काल पाकिस्तान सरकार विरोधात आंदोलन केले. या निषेधामुळे पाकिस्तानच्या जनतेचा सरकारविरोधातील रोष दिसून आला. १३ ऑगस्ट रोजी रात्री उशीरा मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर आले. यामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, या लोकांनी स्वातंत्र्याची मागणी करायला सुरूवात केली. यावेळी या आंदोलकांनी "अमेरिका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले" अशा घोषणा देत पाकिस्तानी सैन्य आणि सरकारविरुद्ध निदर्शने केली.
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
या निदर्शनांदरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. लाठीचार्जही केला, यामध्ये अनेक निदर्शक जखमी झाले आणि काहींना ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मागील अनेक दिवसांपासून पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक लोक पाकिस्तानी प्रशासन आणि लष्कराच्या दडपशाही वृत्तीविरुद्ध असंतोष व्यक्त करत आहेत. रावलकोटमध्ये झालेल्या निदर्शनाचे मुख्य कारण स्वातंत्र्याची मागणी आणि स्थानिक लोकांच्या हक्कांचे उल्लंघन असल्याचे म्हटले जाते. पाकिस्तानी सैन्य आणि सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांची धोरणे पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांच्या हिताच्या विरोधात असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले. "अमेरिका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले" ही घोषणा पाकिस्तानी सैन्याविरुद्ध तीव्र संताप दर्शवते. या घोषणेद्वारे, निदर्शक असा संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहेत की पाकिस्तानी सैन्य परदेशी शक्तींच्या, विशेषतः अमेरिकेच्या इशाऱ्यावर काम करत आहे आणि स्थानिक लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहे.
पाकिस्तान सरकारविराधात घोषणा
१३ ऑगस्टच्या रात्री, रावलकोटमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी पाकिस्तानी सैन्याविरुद्ध घोषणाबाजी केली. निदर्शकांनी "आझादी है हक हमारा" असे नारेही दिले. यादरम्यान, एक मूल घोषणा देते - 'अमेरिकेने कुत्रे पाळले आहेत', त्यानंतर मागून निदर्शक जमाव म्हणतो - 'गणवेशधारी लोक, गणवेशधारी लोक.' यादरम्यान, परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार केला.