शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 08:57 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याला मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे.

Donald Trump on Iran-Israel War: गेल्या आठवड्याभरापासून इस्रायल करत असलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शरणागती पत्करण्याची मागणी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी धुडकावून लावली. बुधवारी अयातुल्ला अली खामेनी यांनी युद्धाला सुरुवात झाल्याचे जाहीर केले होते. खामेनी कुठे आहेत हे आम्हाला माहित आहे पण त्यांना सध्या ठार मारण्याचा आमचा विचार नाही असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. त्यानंतर अमेरिकेने जर लष्करी हस्तक्षेप केला, तर त्या देशाची कधीही भरून येणार नाही इतकी प्रचंड हानी होईल, असा इशारा त्यांनी दिला. आता  अमेरिका अखेर इराणविरुद्ध युद्धात उडी घेणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याच्या योजनेला मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे.

इराण-इस्रायल युद्धात उडी घेण्यास अमेरिका पूर्णपणे तयार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. त्यांनी अंतिम आदेशाची वाट पाहण्यास सांगितले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या दरम्यान त्यांनी हल्ल्याला मान्यता दिली. मात्र तेहरान आपला अणुकार्यक्रम थांबवणार आहे की नाही हे पाहण्यासाठी ट्रम्प यांनी अंतिम आदेश स्थगित केला आहे. जर इराण सरकारने आपला अणुकार्यक्रम थांबवला तरच ट्रम्प हल्ल्याची योजना थांबवतील, अन्यथा अमेरिका इस्रायलच्या वतीने इराणविरुद्धच्या युद्धात सामील होईल. 

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार बैठकीला उपस्थित असलेल्या तीन वरिष्ठ सहकाऱ्यांनी एका अहवालात याबद्दल माहिती दिली. इस्रायली हल्ल्यांमध्ये सहभागी होण्याची धमकी देऊन तेहरान आपला अणुकार्यक्रम सोडून देईल अशी राष्ट्राध्यक्षांना आशा आहे, असं या अहवालात म्हटलं आहे. इराणी सैन्याच्या हल्ल्याला बळी पडण्याची शक्यता असल्याने अमेरिकन सैन्याने मध्य पूर्वेतील तळांवरून काही विमाने आणि जहाजे हलवली आहेत. हा निर्णय अमेरिकन सैन्याच्या सुरक्षा योजनेचा एक भाग आहे, असं एका अधिकाऱ्याने सांगितले. किती विमाने किंवा जहाजे हलवण्यात आली आहेत आणि ती कुठे जातील याबद्दल त्यांनी कोणतीही माहिती दिलेला नाही.

एकीकडे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्यास मान्यता दिली आहे. मात्र ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहोचवणाऱ्या समर्थक गटांनी असं करण्यास नकार दिला आहे. त्यांना अमेरिकेला मध्य पूर्वेतील नवीन युद्धात ढकलला जाऊ नये असे वाटत आहे. या निर्णयामुळे ट्रम्प यांना सत्तेत आणणाऱ्या समर्थकांमध्ये एक फूट निर्माण झाली आहे. त्यांच्या काही समर्थकांनी त्यांना मध्य पूर्वेतील नवीन युद्धात देशाला सहभागी करू नये असे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणIsraelइस्रायल