शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:08 IST

ट्रम्प म्हणाले, टॅरिफ हे केवळ अमेरिकेची शक्तीच दर्शवणारेच नाही, तर जागतिक पातळीवर दबाव निर्माण करण्यासाठी एक प्रभावी साधन ठरले आहे...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आपल्या विधानांमुळे चर्चेत आले आहेत. देशाला संबोधित करताना, आपल्या निर्णयामुळे आणि धोरणांमुळे जगातील अनेक मोठे संघर्ष संपुष्टात आल्याचा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला. आपण केवळ दहा महिन्यांतच आठ युद्धे संपवली, या यशामागे 'टॅरिफ' (आयात शुल्क) धोरण हीच सर्वात मोठी ताकद होती, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

"टॅरिफ हा शब्द मला सर्वाधिक प्रिय आहे" -ट्रम्प म्हणाले, टॅरिफ हे केवळ अमेरिकेची शक्तीच दर्शवणारेच नाही, तर जागतिक पातळीवर दबाव निर्माण करण्यासाठी एक प्रभावी साधन ठरले आहे. "टॅरिफ हा शब्द मला सर्वाधिक प्रिय आहे," असे म्हणत त्यांनी आपल्या व्यापार धोरणाचे जोरदार समर्थन केले. यामुळे अमेरिकन उद्योगांना संरक्षण मिळाले आणि महसुलात मोठी वाढ झाली, असा दावा त्यांनी केला आहे. तत्पूर्वी, ट्रम्प प्रशासनाने भारतासह, कॅनडा, मेक्सिको आणि ब्राझील यांसारख्या देशांवर टॅरिफ लागू केला आहे.

आपल्या २०२६ च्या अजेंड्यासंदर्बातील भाषणात बोलताना ट्रम्प म्हणाले, "आपल्या प्रयत्नांमुळे इराणचा अणू धोका संपुष्टात आला, गाझा येथील दीर्घकालीन संघर्षात शांतता प्रस्थापित झाली, ओलिसांची जिवंत किंवा मृत स्वरूपात सुटका करणे आपल्या धोरणांमुळे शक्य झाले." मात्र, ट्रम्प यांचे हे दावे अतिशयोक्ती आहेत, असे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

बायडेन सरकारवर टीक - या आपल्या संबोधनात डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढती महागाई आणि सामानाच्या किमती यांवर फारसे भाष्य न करता, ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या कर कपातीचे जोरदार समर्थन केले. याच वेळी, त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. देशातील सद्यस्थिती, महागाई आणि इमिग्रेशन (Immigration) आदी समस्यांना गत सरकारच जबाबदार असून, आपण आता परिस्थिती सुधारण्याचे काम करत आहोत, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump claims tariff success: 'My favorite,' ended wars in months!

Web Summary : Donald Trump touted his tariff policy as key to resolving global conflicts, claiming to have ended eight wars in ten months. He criticized Biden's administration for inflation and immigration issues while advocating for Republican tax cuts.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिकाTrade Tariff Warटॅरिफ युद्ध