शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये जमावावर अंदाधुंद गोळीबार; तिघांचा मृत्यू, 14 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 16:28 IST

America Philadelphia : अमेरिकेत अलीकडच्या काळात गोळीबाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये एका बंदूकधाऱ्याने जमावावर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. अमेरिकन न्यूज चॅनल एनबीसीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्रीनंतर घडली. यात अनेक बंदूकधारी सामील असल्याचं म्हटलं जात आहे. प्राथमिक रिपोर्टनुसार मृतांचा आकडा वाढू शकतो. आतापर्यंत किमान 14 जण जखमी झाल्याची माहिती आहे. 

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही परंतु एक शस्त्र जप्त करण्यात आलं आहे. सध्या संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, शूटरपैकी एक अमेरिकन साऊथ स्ट्रीटवर धावताना दिसला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी दोन बंदुका सापडल्या असून त्यापैकी एकामध्ये एक मॅगझिन आहे. अधिकाऱ्यांनी साऊथ स्ट्रीटवरील दुसऱ्या आणि पाचव्या रस्त्यांदरम्यानचा भाग रात्रभर बंद केला.

मृतांचा आकडा वाढू शकतो

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 25 वर्षीय महिला आणि एका 22 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 7 जखमींना थॉमस जेफरसन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयितासह इतर पाच जणांना पेनसिल्व्हेनिया रुग्णालयात नेण्यात आले. इतर तीन जणांना पेन प्रेस्बिटेरियन मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले. अमेरिकेत अलीकडच्या काळात गोळीबाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 25 मे रोजी टेक्सासमधील एका शाळेत झालेल्या गोळीबारात 19 विद्यार्थ्यांसह 23 जणांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबार