शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : जगात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या अमेरिकेत, चीनलाही टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 14:39 IST

जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाच्या रियल टाईम कोरोना व्हायसर ट्रॅकरनुसार, अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या वाढू ती 82,404 वर पोहोचली आहे. अमेरिका इतर देशांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांचा शोध घेत आहे. हेदेखील यामागचे एक कारण आहे.

ठळक मुद्देअमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या 82,404 वर अमेरिकेत आठ दिवसांत 2 लाख 20 हजारहून अधिक लोकांची तपासणी अमेरिकेत आतापर्यंत 1,178 लोकांचाच कोरोनामुळे मृत्यू

वॉशिंग्टन - कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. आता अमेरिकाच कोरोनाचे केंद्र होतो की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण  अमेरिकने कोरोना संक्रमित रुग्ण संख्येच्या बाबतीत आता चीनलाही मागे टाकले आहे. 

जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाच्या रियल टाईम कोरोना व्हायसर ट्रॅकरनुसार, अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या वाढू ती 82,404 वर पोहोचली आहे. अमेरिका इतर देशांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांचा शोध घेत आहे. हेदेखील यामागचे एक कारण आहे.

आतापर्यंत 3 लाख 70 हजार लोकांची तपासणी -व्हाइट हाऊसमधील कोरनासंदर्भातील समन्वयक डॉ. डेबोरा बीरक्स यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आतापर्यंत अमेरिकेने 3 लाख 70 हजार लोकांची तपासणी केली आहे. गेल्या आठ दिवसांत आम्ही 2 लाख 20 हजारहून अधिक लोकांची तपासणी केली, असे त्यांनी सांगितले.

चीनमध्ये आतापर्यंत 81 हजार 782 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, असे असले तरी अमेरिकेतील मृतांचा आकडा चीनच्या तुलनेत कमी आहे. अमेरिकेत आतापर्यंत केवळ 1,178 लोकांचाच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर चीनमध्ये 3,291 लोकांचा कोरोनामुले मृत्यू झाला आहे.

160 मिलियन अमेरिकन जणतेला घरातच थांबण्याचा आदेश -द न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार जवळपास 160 मिलियन अमेरिकन जणतेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. एवढेच नाही, तर येथील शाळा, बार आणि रस्तेही बंद करण्यात आले आहेत. 

डब्ल्यूएचओने 11 मार्चला कोरोना ही एक जागतीक महामारी असल्याची घोषित केले होते. अमेरिकेत न्यू यॉर्क हे शहर कोरोना व्हायरसचे केंद्र बनले आहे. या एकट्या शहरात आतापर्यंत जवळपास 38,000 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर  281 लोक मरण पावले आहेत.

कोरोनाचा धोका वाढवणाऱ्यांना मानले जाणार 'दहशतवादी' -अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या नियमांकडे तेथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे येथील कोरोना बाधितांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता येथील न्यायविभागाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. एका नव्या आदेशानुसार, आता कोरोना व्हायरसचा धोका दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्यांना येथे दहशतवादी समजण्यात येणार आहे. एवढेच नाही तर गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मठेपेच्या शिक्षेचीही तरतूद यात करण्यात आली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प