शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

फाशी किंवा विषाचे इंजेक्शन नाही; अमेरिकेत पहिल्यांदाच गॅसद्वारे दिली जाणार मृत्यूदंडाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 18:41 IST

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या कैद्याला गॅसद्वारे मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे.

America News : अमेरिकेतील एका कैद्याला नायट्रोजन वायूद्वारे मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केनेथ यूजीन स्मिथ असे या कैद्याचे नाव असून, येत्या 25 जानेवारी रोजी त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी होईल. एखाद्या कैद्याला अशा प्रकारे मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची अमेरिकेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, केनेथ यूजीन स्मिथने 1988 मध्ये पैशांसाठी एका महिलेची हत्या केली होती. त्याला 1996 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अनेक वर्षा शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही. 2022 मध्ये त्याला विषारी इंजेक्शनही देण्यात आले होते, पण त्यातून तो वाचला. आता त्याला 25 जानेवारी रोजी शिक्षा दिली जाणार आहे. 

या शिक्षेला त्याच्या वकिलांनी कोर्टात आव्हान दिले आहे. स्मिथवर प्रयोग केला जात असल्याचा आरोप त्याच्या वकिलांचे केला आहे. ही पद्धत धोक्याची तर आहेच, पण संविधानाचे उल्लंघनही असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. यावर संयुक्त राष्ट्र संघानेही आक्षेप नोंदवला आहे. संयुक्त राष्ट्रांनी या शिक्षेला अमानवी आणि क्रूर ठरवत बंदी घालण्याची मागणी केली आहे.

अशी दिली जाईल शिक्षारिपोर्ट्सनुसार, सर्वप्रथम स्मिथला स्ट्रेचरवर झोपवले जाईल, यानंतर त्याच्या चेहऱ्यावर मास्क लावला जाईल. यातून त्याच्या शरीरात नायट्रोजन वायू सोडला जाईल. मास्क लावल्यामुळे त्याला ऑक्सिजन मिळणार नाही आणि त्याचा मृत्यू होईल. त्याला किमान 15 मिनिटे मास्कद्वारे नायट्रोजन दिले जाईल. नायट्रोजन वायूमुळे तो काही सेकंदात बेशुद्ध होईल आणि काही मिनिटांतच त्याचा मृत्यू होईल, असे सरकारी वकिलाने न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :AmericaअमेरिकाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी