शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

बायडेन यांनी शब्द पाळला; पदभार स्वीकारताच हवामान बदल, WHO, कोरोनाबाबत ट्रम्प यांचे 'ते' निर्णय घेतले मागे

By जयदीप दाभोळकर | Updated: January 21, 2021 09:13 IST

बायडेन यांनी सूत्र स्वीकारताच आश्वासनांची पूर्तता करण्यास केली सुरूवात

ठळक मुद्देपदभार स्वीकारताच बायडेन यांनी केली कामाला सुरूवातपहिल्याच दिवशी दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यास बायडेन यांची सुरूवात

कोरोनामुळे मरगळलेली अर्थव्यवस्था, कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे वाढत चाललेली मृतांची संख्या, कॅपिटॉल हिलवर अलीकडेच झालेला हल्ला, अशी चारही बाजूंनी निराशाजनक परिस्थिती असताना व्हाइट हाउसच्या प्रांगणात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या वेळी असंख्य मान्यवर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सोहळ्याला पाठ दाखवली. मात्र, मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताच बायडेन यांनी कामालाही सुरूवात केली. तसंच बायडेन यांनी निवडणुकांपूर्वी दिलेला शब्दही पाळला.बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले काही निर्णय मागे घेतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी घेतलेले काही निर्णय मागे घेतले. निवडणुकांदरम्यान बायडेन यांनी दिलेल्या आश्वासनांची आणि मोठ्या कालावधीपासून सुरू असलेल्या अमेरिकेतील मागण्यांवर बायडेन यांनी स्वाक्षरी केली.  यादरम्यान त्यांनी कोरोना महासाथीला आटोक्यात आणण्यासाठी एक निर्णय घेतला. तसंच मास्कचा वापरही बंधनकारक करण्यात आला, सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्याची घोषणा, वातावरण बदलवरील ट्रम्प यांचा निर्णय मागे, वर्णभेद संपवण्याच्या दिशेनं पाऊल, जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्यावर रोख, सीमेवर भिंत उभारण्याचा निर्णय मागे घेत निधीही थांबवला, मुस्लीम देशांवर घातलेली बंदी मागे, तसंच विद्यार्थ्यांना दिलेल्या कर्जाचे हप्ते वसूल करण्याच्या निर्णयाला सप्टेंबर महिन्यापर्यंत स्थगिती, असे अनेक निर्णय़ बायडेन यांनी सूत्रं स्वीकारताच घेतले.  डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातचं बाहुले असल्याचं सांगत कोरोना काळातच त्यातू बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान बायडेन यांनी आपण निवडून आल्यास जागतिक आरोग्य संघटनेत परतू असं आश्वासन दिलं होतं. त्यांनी सत्तेत येताच आपला शब्द पाळला आहे. संयुक्त राष्ट्रांकडूनही अमेरिकेच्य़ा या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाPresidentराष्ट्राध्यक्षJoe Bidenज्यो बायडनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS ElectionAmerica ElectionParisपॅरिसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाchinaचीन