शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 15:01 IST

America Attack on Iran: मध्य पूर्वेतील एक न्यूज वेबसाईट अमवाज मीडियानुसार इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती त्यांना पुरविली आहे. अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर, संयुक्त राष्ट्रांच्या अणु देखरेख संस्थेने (IAEA) सोमवारी आपत्कालीन बैठक बोलावण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकेने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढविल्यानंतर मोठी बातमी समोर येत आहे. आम्हाला युद्ध करायचे नाहीय, परंतू आम्ही तुमच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान अणुकेंद्रांवर हल्ले करणार आहोत, असे खुद्द अमेरिकेनेच इराणला एक दिवस आधी सांगितले होते, असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. 

बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...

मध्य पूर्वेतील एक न्यूज वेबसाईट अमवाज मीडियानुसार इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती त्यांना पुरविली आहे. हल्ला करणार असल्याची आगाऊ नोटीस अमेरिकेने इराणला पाठविली होती, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

या अधिकाऱ्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. ट्रम्प सरकारने २१ जूनलाच ही नोटीस पाठविली होती. यामध्ये आमचा उद्देश इराणसोबत युद्ध करायचा नाहीय. आम्हाला फक्त फोर्डो, नतांज आणि इस्फहान या अणूसुविधा केंद्रांवर हल्ला करायचा आहे, असे म्हटले होते. 

अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर, संयुक्त राष्ट्रांच्या अणु देखरेख संस्थेने (IAEA) सोमवारी आपत्कालीन बैठक बोलावण्याची घोषणा केली आहे. IAEA चे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली आहे. तसेच या संस्थेने इराणमध्ये हल्ला झालेल्या ठिकाणांवर रेडिएशनची पातळी वाढली नसल्याचे म्हटले आहे. तसेच आम्ही काही अपडेट आल्यास कळवू, असेही म्हटले आहे. अमेरिकेने जरी यशस्वी हल्ला केल्याचा दावा केला असला तरी इराणने आमच्या अण्वस्त्रांच्या ठिकाणांना कोणतेही नुकसान झालेले नाहीय. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. तसेच रेडिएशन लीकही झालेले नाहीय, असे म्हटले आहे. इराणच्या सरकारी मीडियाने ही माहिती दिली आहे. इराणची अणुउर्जा संस्था (AEOI) ने ही माहिती जाहीर केली आहे. 

फोर्डोवर ६ बंकर बॉम्ब टाकण्यात आले आणि ३० टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी इतर इराणी अणुस्थळे नष्ट करण्यात आली. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या फ्लाइट ट्रॅकिंग डेटा आणि ऑडिओ कम्युनिकेशन्सनुसार अमेरिकेतील मिसूरी येथील व्हाइटमन एअर फोर्स बेसवरून ग्वाममधील यूएस एअर फोर्स बेसवर बी२ बॉम्बर विमाने जाताना दिसली होती. विमानात मोठा पेलोड असल्याने जास्त इंधन न घेताच ही विमाने झेपावली होती. 

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प