शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:53 IST

America Syria War: भारताविरोधात वेळोवेळी पाकिस्तानला मदत, अगदी बांगलादेश मुक्तीसंग्रामावेळीही विमानवाहू युद्धनौका भारतावर चाल करून पाठविणारा हाच अमेरिका देश.

अमेरिका किती कपटी आणि संधीसाधू देश आहे हे संपूर्ण जगाने वेळोवेळी पाहिले आहे. एखाद्या देशाला युद्धासाठी उकसवायचे आणि मन भरले की मध्येच त्याची साथ सोडून जायचे हा त्यांचा स्वभावच बनला आहे. भारताविरोधात वेळोवेळी पाकिस्तानला मदत, अगदी बांगलादेश मुक्तीसंग्रामावेळीही विमानवाहू युद्धनौका भारतावर चाल करून पाठविणारा हाच अमेरिका देश. आज त्याने आणखी एका देशाला दगा दिला आहे. 

 अमेरिकेने सीरियाच्या तत्कालीन बशर अल-असद राजवटीविरुद्ध एक सैन्य उभे केले होते. त्याचे नाव सीरियन डेमोक्रॅटिक फोर्स असे होते. या फोर्सला आता अमेरिकेने वाऱ्यावर सोडले आहे. या मिलिशियाचा वापर सीरिया आणि इराकमध्ये इस्लामिक स्टेटविरुद्धच्या युद्धात पुरेपूर करून घेण्यात आला. आता सीरियात ना असद उरला ना इस्लामिक स्टेट, आपला उद्देश संपताच अमेरिकेने सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सला त्यांच्या नशिबावर सोडले आहे. 

अमेरिकेने ईशान्य सीरियातील दोन लष्करी तळांवरून आपले सैन्य मागे घेतले आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्येही हेच केले होते. तालिबानविरोधात अनेक वर्षे युद्ध केले, अफगाणिस्तान ताब्यात घेतला आणि नंतर या भागात सरकार स्थापन करून बोऱ्याबिस्तरा आवरता घेत काढता पाय घेतला. या अफगाणिस्तानमध्ये त्या सरकारला तालिबानविरोधात आठवडाभरही तग धरता आला नाही आणि पलायन करावे लागले. आता तिथे तालिबानी सरकार आहे. 

आता सीरियात देखील तेच होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या या हालचालीमुळे सीरियामध्ये इस्लामिक स्टेट पुन्हा उदयास येण्याची शक्यता वाढली आहे, असे सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसच्या कमांडरने सांगितले आहे. दोन्ही ठिकाणी सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसच्या लहान तुकड्या तैनात आहेत. अमेरिकी सैनिक नावाला दिसत आहे. लष्करी तळांवर वापरलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकण्यात आले आहेत. हसाका प्रांतातील अल-वझीर आणि तेल बेदर तळांवरून अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे. परंतू, ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर असे चार तळ रिकामे झाल्याचे सांगितले जात आहे. आणखी तीन तळ खाली करण्यात येणार आहेत. केवळ एका तळावरच सैन्य उपस्थित असेल ते देखील ५०० एवढ्या कमी संख्येने असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाSyriaसीरियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प