शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाच्या आगीत अमेरिका होरपळली! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक चीन दौरा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:17 IST

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट अमेरिकेच्या राजनैतिक निर्णयांवर पडू लागले आहेत.

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या युद्धाचे पडसाद आता थेट अमेरिकेच्या राजनैतिक निर्णयांवर पडू लागले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक मानला जाणारा चीन दौरा तडकाफडकी लांबणीवर टाकला आहे. "युद्ध सुरू असताना माझं वॉशिंग्टनमध्ये असणं जास्त गरजेचं आहे," असं स्पष्ट करत ट्रम्प यांनी सध्या आपला पूर्ण फोकस युद्धावरच असल्याचं जाहीर केलं आहे.

नेमका काय होता कार्यक्रम?

डोनाल्ड ट्रम्प ३१ मार्च ते २ एप्रिल या काळात चीनच्या दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्यात त्यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी भेट होणार होती. व्यापार आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने ही भेट अत्यंत कळीची मानली जात होती. मात्र, इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाने रौद्र रूप धारण केल्यामुळे ट्रम्प यांनी सध्या परदेश दौरा न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

दौरा रद्द करण्यामागचं खरं कारण काय?

ट्रम्प यांनी स्वतः या निर्णयाचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, "सध्या इराणसोबत आमचं युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत देश सोडून जाणं योग्य ठरणार नाही. हा निर्णय अत्यंत साधा आणि स्पष्ट आहे; माझ्या देशात युद्धजन्य परिस्थिती असताना माझं इथे उपस्थित राहणं अनिवार्य आहे." मात्र, हे युद्ध लवकरच संपेल आणि त्यानंतर जग अधिक सुरक्षित होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

तेल पुरवठ्यावर टांगती तलवार!

दुसरीकडे, इराणने दिलेल्या एका धमकीने जगाची चिंता वाढवली आहे. जर अमेरिकेने हल्ले थांबवले नाहीत, तर 'होर्मुजची सामुद्रधुनी'वरून होणारी जहाजांची वाहतूक रोखू, असा इशारा इराणने दिला आहे. जगातील एकूण २० टक्के तेल पुरवठा याच मार्गाने होतो. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक स्तरावर इंधन टंचाई आणि महागाईचा भडका उडू शकतो. याच धोक्यामुळे ट्रम्प सध्या अमेरिकेत राहून या संकटाचा सामना करत आहेत.

चीनची भूमिका गुलदस्त्यात?

ट्रम्प यांनी चीनसह अनेक देशांना आवाहन केलं आहे की, त्यांनी या सागरी मार्गावरून होणारी वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार्य करावं. मात्र, चीनकडून अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातील भेट जरी टळली असली, तरी दोन्ही देशांचे अधिकारी व्यापार आणि इतर मुद्द्यांवर पडद्यामागून चर्चा करत आहेत, जेणेकरून भविष्यात ही भेट यशस्वी होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Amidst War, Trump Cancels China Visit, Focuses on Iran Crisis

Web Summary : President Trump abruptly postponed his China visit due to escalating tensions with Iran. Citing the need to remain in Washington during the conflict, Trump emphasized his focus on national security. Concerns over oil supply routes add to the crisis.
टॅग्स :AmericaअमेरिकाchinaचीनUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर