शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 09:43 IST

Israel On America Iran Ceasefire: अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रबंधीची घोषणा झाल्यावर इस्रायलने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Israel On America Iran Ceasefire: अखेर अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली. दोन आठवड्यांसाठी ही शस्त्रसंधी लागू असणार आहे. अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भूमिकेत अचानक बदल केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्यापुरती लष्करी कारवाई थांबवण्याची घोषणा केली. दोन आठवड्यांसाठी इराणवरील बॉम्बहल्ले आणि इतर आक्रमणे स्थगित करण्यास सहमत आहे. सर्वसमावेशक युद्धविरामाच्या दिशेने एक पाऊल आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून एक दहा कलमी प्रस्ताव अमेरिकेला पाठवला आहे. यानंतर आता इस्रायलने भूमिका स्पष्ट केली आहे. 

अहिंसेची वचनबद्धता, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम ठेवणे, युरेनियम संवर्धनाला मान्यता, सर्व प्राथमिक निर्बंध हटवणे, सर्व दुय्यम निर्बंध हटवणे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सर्व ठराव रद्द करणे, नियामक मंडळाचे सर्व ठराव रद्द करणे, इराणला नुकसान भरपाई देणे, या प्रदेशातून अमेरिकी सैन्य मागे घेणे,  लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्धच्या लढाईसह सर्व आघाड्यांवर युद्धविराम, अशा १० मुद्द्यांचा या प्रस्तावात समावेश आहे. परंतु, यातील काही मुद्द्यांना इस्रायलचा आक्षेप असल्याचे म्हटले जात आहे. 

लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्धची लढाई सुरूच राहणार

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने बुधवारी सांगितले की, अमेरिका आणि इराण या दोन देशांत दोन आठवड्यांचा शस्त्रसंधी करार झाला असला तरी, इस्रायलची लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्ध जी लढाई सुरू आहे, त्यासाठी हा करार लागू नसेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला इस्रायलचा पाठिंबा आहे. इराणने तत्काळ होर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी. अमेरिका, इस्रायल तसेच या प्रदेशातील इतर देशांवरील सर्व हल्ले थांबवावेत, अशी मागणी इस्रायलने केली आहे.

दरम्यान, अमेरिका, इस्रायल, आखाती देशांसह जगाला यापुढे आण्विक, क्षेपणास्त्र आणि दहशतवादी धोका निर्माण होऊ नये, हे सुनिश्चित करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना पाठिंबा असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. तसेच अमेरिका, इस्रायल आणि इस्रायलच्या प्रादेशिक मित्र राष्ट्रांनी सामायिक केलेली ही उद्दिष्ट्ये आगामी वाटाघाटींमध्ये साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहेत. परंतु, दोन आठवड्यांचा शस्त्रसंधी करार लेबनॉनला लागू होत नाही, हे इस्रायलने अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : No ceasefire for Hezbollah: Israel clarifies stance amid US-Iran truce.

Web Summary : Israel opposes parts of US-Iran ceasefire proposal. While backing US efforts to halt Iranian aggression, Netanyahu's office stated the truce excludes its fight against Hezbollah in Lebanon. Israel demands Iran cease regional attacks and open the Strait of Hormuz.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIsraelइस्रायलBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराण