शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 05:35 IST

अनेक कार्यालये बंद केली जातील, काही तर कायमची बंद केली जाण्याच्या भीतीने देशवासीय चिंतेत आहेत. शटडाऊनमुळे शिक्षण, पर्यावरण व इतर सेवा विस्कळित होण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि काँग्रेस बुधवारच्या अंतिम मुदतीपर्यंत सरकारी कार्यक्रम आणि सेवा सुरू ठेवण्यासाठी करार करण्यात अयशस्वी ठरल्यानंतर सरकारी शटडाऊन सुरू झाले असून, यामुळे अमेरिका अनिश्चिततेच्या भोवऱ्यात आहे. यामुळे देशभरातील ७,५०,००० कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे.

अनेक कार्यालये बंद केली जातील, काही तर कायमची बंद केली जाण्याच्या भीतीने देशवासीय चिंतेत आहेत. शटडाऊनमुळे शिक्षण, पर्यावरण व इतर सेवा विस्कळित होण्याची शक्यता आहे.

वादाचा ठिणगी अशी पडली रिपब्लिकन पक्ष कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही. ट्रम्प यांनी विरोधी पक्षाचा उपहास करणारे, वंशविद्वेषी ठरलेले एक व्हिडिओ प्रसारित केल्याने वातावरण आणखी तापले. उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी सांगितले की, लष्करी कर्मचारी बिनपगाराने काम करतील, उड्डाण व्यवस्थेत अडथळे येतील,  अन्नधान्य योजना थांबेल.

सर्वांत मोठा शटडाऊनट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात ३५ दिवसांचा, इतिहासातील सर्वात मोठा शटडाऊन झाला होता. २०१३ मध्ये ओबामांच्या कार्यकाळात ‘ओबामाकेअर’वरून १६ दिवसांचे शटडाऊन झाले होते.

अर्थकारणाला धक्काया शटडाऊनचा देशव्यापी आर्थिक परिणाम होईल. गोल्डमन सॅक्ससह अनेक वित्तीय संस्थांनी आधीच्या शटडाऊनना बाजाराने तितका धक्का बसत नसल्याचे म्हटले असले, तरी या वेळी परिस्थिती गंभीर होऊ शकेल, असा इशारा दिला आहे. ट्रम्प यावर लवकरच तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : US Shutdown Looms, jeopardizing 750,000 Government Workers' Jobs.

Web Summary : A US government shutdown looms as Trump and Congress fail to reach an agreement. Approximately 750,000 government workers face uncertainty. Services like education and environment may be disrupted. Previous shutdowns have impacted the economy, and this one could be serious.
टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प