शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:40 IST

America Immigration Policy: व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी तीव्र संताप व्यक्त केला.

America Immigration Policy: अमेरिकेतील न्यूयॉर्क विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्याला बेड्या घालून जमिनीवर पाडल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया आणि बातम्यांमधून व्हायरल होत आहे. या घटनेमुळे अमेरिकेत भारतीयांविरुद्ध वाढत्या भेदभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. याप्रकरणी भारतीय दूतावास हस्तक्षेप करत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत इमिग्रेशन धोरणाच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले आहेत. लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांनी अमेरिकेला हादरवून सोडले आहे. यादरम्यान, न्यूयॉर्क विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्याला दिलेल्या अमानुष वागणुकीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

संबंधित विद्यार्थ्याला बेड्या घालून जमिनीवर फेकण्यात आले आले आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन व्यापारी कुणाल जैन यांनी रविवारी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी भारतीय दूतावासाला हस्तक्षेप करण्याची मागणीही केली आहे. 

जैन यांनी आपल्या पोस्टमद्ये भारतीय दूतावास, अमेरिका आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. त्यांनी लिहिले - या विद्यार्थ्यासोबत काय होत आहे, ते कोणीतरी शोधून काढावे. असे प्रकार दररोज समोर येत आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतीय दूतावास या प्रकरणात सक्रिय झाला आहे.

भारतीय दूतावासाने या घटनेवर म्हटले की, आमच्याकडे भारतीय विद्यार्थ्याला दिलेल्या अमानुष वागणुकीचा व्हिडिओ आला आहे. आम्ही या संदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. भारतीय नागरिकांच्या कल्याणासाठी दूतावास नेहमीच वचनबद्ध आहे. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतStudentविद्यार्थी