शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संकटं संपता संपेना! कोरोना, डेल्टानंतर आता RS व्हायरसचे थैमान; नवजात बाळांनाही विळखा; जाणून घ्या, लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 16:03 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता RS व्हायरसचे थैमान घातले आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 19 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 40 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता RS व्हायरसचे थैमान घातले आहे. नवजात बाळांनाही या व्हायरसने विळखा घातल्याची माहिती मिळत आहे. कोरोना, डेल्टा व्हेरिएंटनंतर आता अमेरिकेत RSV अर्थातच रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस आढळून आला आहे. त्यामुळे अगदी 2 आठवड्यांच्या नवजात बाळापासून  ते 17 वर्षांच्या मुलांपर्यंत अनेकजण या व्हायरसच्या विळख्यात सापडत आहेत.

अमेरिकेत आता डेल्टासोबतच RS व्हायरसबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला तर काय करायचं? हा प्रश्न आता तज्ज्ञांना सतावू लागला आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन संस्थेनं जारी केलेल्या आकडेवारीचा आधार घेत न्यूयॉर्क टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. यामध्ये जून महिन्यापासून अमेरिकेत RSV बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. जुलै महिन्यात या व्हायरस बाधित रुग्णांचा दर खूपच जास्त होता.

RSV ची लागण झाल्यावर नाक वाहणं, खोकला येणं, शिंका येणं आणि ताप यासारखी लक्षणं दिसू शकतात. ह्युस्टनमधील टेक्सास चिल्ड्रन हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ हीदर हक याबाबत एक ट्विट केलं आहे. "गेल्या काही महिन्यांपासून शून्य ते अगदी नवजात बालकांना कोरोना व्हायरसची लागण होतं आहे. नवजात बालकं, लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण वाढलं आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे" असं हीदर हक यांनी म्हटलं आहे. 

न्यूयॉर्क टाईम्सच्या आकडेवारीनुसार, मागील काही दिवसांपासून अमेरिकेत नव्याने कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतं आहे. गेल्या दोन आठवड्यांत 148 टक्क्यांनी ही वाढ झाली आहे. तर, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील 73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. डेल्टा व्हेरिअंटमुळे कोरोना रुग्णांचा आलेख वाढला असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय अनेक राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग मंदावल्याने ही वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर