शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

America-China War: गरज पडली तर फौजाही धाडू...! अमेरिकन जनरलच्या युद्धाच्या शक्यतेवर चीनचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 21:15 IST

जनरल माईक मिनिहन यांनी एअरफोर्सला लिहिलेल्या मेमोमध्ये अमेरिका-चीन युद्धावर भाष्य केले होते. यावर चीनने युद्धाची दोन कारणे सांगितली आहेत.

अमेरिका आणि चीनमध्ये दोन वर्षांत युद्ध पेटणार असल्याची शक्यता अमेरिकेच्या हवाईदलाच्या जनरलने व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. यावर आता चीनच्या जिनपिंग यांच्या सरकारने देखील उत्तर दिले आहे. गरज पडली तर आम्ही फौजाही तैवानमध्ये उतरवू, असे चीनने म्हटले आहे. 

जनरल माईक मिनिहन यांनी एअरफोर्सला लिहिलेल्या मेमोमध्ये अमेरिका-चीन युद्धावर भाष्य केले होते. मला वाटते की आपण 2025 मध्ये चीनसोबत युद्ध करू. ही भीती चुकीची सिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे, परंतु अमेरिका आणि तैवान या दोन्ही देशांत २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होतील. त्यामुळे चीनकडून लष्करी कारवाई केली जाऊ शकते, असे मिनिहन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाला अमेरिकन काँग्रेसचे ज्येष्ठ रिपब्लिकन खासदार मायकल मॅकॉल यांनीही पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले होते की, तैवानच्या मुद्द्यावर चीनसोबत संघर्ष होण्याची शक्यता खूप जास्त आहे.

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले की, तैवान सामुद्रधुनीवर चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींवरून चीनचे हेतू स्पष्टपणे दिसत आहेत. चीनने गेल्या काही वर्षांत तैवानवर राजनैतिक, लष्करी आणि आर्थिक दबावही वाढवला आहे. तैवानला शांतता हवी आहे, परंतू हल्ला झाल्यास त्याला प्रतिकार नक्कीच केला जाईल. 

यावर चीन खवळला आहे. अमेरिकन अधिकार्‍यांच्या या विधानाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्ही अमेरिकेला आवाहन करतो की वन चायना पॉ़लिसीला गांभीर्याने घ्यावे आणि दोन्ही देशांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनांचे पालन करावे. तैवानचा डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष स्वातंत्र्यासाठी अमेरिकेवर अवलंबून आहे. अमेरिकेतील काही लोक चीनला रोखण्यासाठी तैवानचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत, या दोन गोष्टी आम्हाला तैवानमध्ये सैन्य उतरविण्यास भाग पाडू शकतात, असे चीनने म्हटले आहे. 

अमेरिकेनेही तैवानशी लष्करी संबंध बंद करावेत. तैवान हा चीनचा एक भाग आहे आणि आम्ही ते शांतपणे आणि प्रामाणिकपणे जोडू इच्छितो, असा पुनरुच्चारही प्रवक्ते निंग यांनी केला आहे. 

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाwarयुद्ध