शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 15:00 IST

America Attack on Iran : अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात फारसं नुकसान झालं नसल्याचे सांगत इराणणे आपली सर्व अणुकेंद्र सुरक्षित असून, किरणोत्सारासारखा कुठला प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याची कुणकुण इराणला आधीच लागली होती का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

अमेरिकेने आज पहाटेच्या सुमारास इराणमधील तीन अणुकेंद्रांना लक्ष्य करत केलेल्या भीषण हल्ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. तसेच आधीच तणावपूर्ण असलेली मध्य पूर्वेतील परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. दरम्यान, इराणमधील फोर्डो, नतांज आणि इस्फहान येथे केलेल्या हल्ल्यात इराणच्या अणुकार्यक्रमाचं जबर नुकसान झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. मात्र इराणने अमेरिकेचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. तसेच या हल्ल्यात फारसं नुकसान झालं नसल्याचे सांगत इराणणे आपली सर्व अणुकेंद्र सुरक्षित असून, किरणोत्सारासारखा कुठला प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याची कुणकुण इराणला आधीच लागली होती का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

इराणवरील इस्राइलच्या सैनिकी कारवाई करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी दोन आठवड्यांची वेळ घेऊ, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र अमेरिकेने रविवारी पहाटेच इराणवर हल्ला करत अनेकांना धक्का दिला आहे. मात्र आम्ही आमची अणुकेंद्र आदीच रिकामी केली होती, असा दावा इराणने केला आहे. त्यामुळे आता इराणचा हा दावा कितपत खरा आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

अमेरिकेने रविवारी पहाटेच्या सुमारास केलेल्या हल्ल्यापूर्वी १९ आणि २० जून रोजी इराणमधील फोर्टो अणुकेंद्राजवळच्या परिसराचे घेतलेले काही सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये या अणुकेंद्राजवळ ट्रक आणि इतर वाहनांची वर्दळ दिसून येत आहे.

१९ जून रोजी भूमिगत लष्करी केंद्राच्या बोगद्यातील प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर १६ कार्गो ट्रक उभे असल्याचे दिसत आहे. तर २० जून रोजी घेतलेल्या फोटोमध्ये यापैकी बहुतांश ट्रक एक किमी उत्तर पश्चिमेकडे असलेल्या रस्त्यावर नेण्यात आले होते. मुख्य परिसराच्या एंट्री पॉईंटजवळ ट्रक आणि काही बुलडोझर दिसत होते. एक ट्रक तर या भूमिगत केंद्राच्या प्रवेशद्वाराशेजारी उभा असलेला दिसत आहे.  

टॅग्स :IranइराणUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय