शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅमेझॉनच्या मालकाचे मित्राच्या पत्नीशीच प्रेमसंबंध? 455 कोटींच्या खासगी विमानातून भ्रमंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 22:49 IST

जगातील सर्वात श्रीमंत जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातमीने उद्योगविश्व ढवळून निघाले आहे.

वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातमीने उद्योगविश्व ढवळून निघाले आहे. मात्र, या घटस्फोटामागचे कारण पुढे येत असून अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांचे माजी टीव्ही अँकरसोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा अमेरिकी मॅग्झीन द एन्क्वायररने केला आहे.

25 वर्षे एकत्र राहिल्यानंतर जेफ बेजोस यांनी पत्नी मॅकेन्झी बेजोस हिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे माजी टीव्ही अँकरसोबतचे प्रेमप्रकरण असल्याचे समजते. लॉरेन सांचेज (49) असे या टीव्ही अँकरचे नाव असून तीनेही पती पॅट्रीक वाईटसेल याच्यापासून घटस्फोट घेतला आहे. वाईटसेल हे हॉलिवूड एजन्सी डब्ल्यूएमईचे सीईओ आहेत. जेफ बेजोस हे वाईटसेल यांच्यामार्फतच सांचेजला दोन वर्षांपूर्वी भेटले होते. ते दोघेही मित्र आहेत.  

द एन्क्वायररने म्हटले आहे की, त्यांच्या चमूने बेजोस आणि लॉरेन सांचेज यांना गेल्या 4 महिन्यांपासून पाळत ठेवली होती. या युगुलाने या काळात खासगी विमानातून 5 राज्यांमध्ये 40 हजार मैल प्रवास केला आहे. याचे आपल्याकडे पुरवे असल्याचा दावाही या मॅग्झीनने केला आहे. हे खासगी जेट 455 कोटी रुपयांचे आहे. 

या प्रेमप्रकरणाची बातमी गुरुवारीच प्रकाशित करण्यात येणार होती. यासाठी बेजोस यांच्या प्रतिनिधीकडे खुलासा मागण्यात आला होता. मात्र, हे कळताच बेजोस यांनी घटस्फोटाची घोषणा केल्याचा दावा करण्यात आला आहे. 

द एन्क्वायरर हा मॅग्झीन हॉलिवूडमधील धक्कादायक बातम्या देण्यासाठी ओळखले जाते. मात्र, बेजोस यांच्या मागे ससेमिरा लावण्यामागे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हात असल्याचे बोलले जात आहे. कारण बेजोस वॉशिंग्टन पोस्टचेही मालक आहेत आणि ट्रम्प यांच्या विरोधात वॉशिंग्टन पोस्टमध्ये बातम्या छापून येत असतात. महत्वाचे म्हणजे द एन्क्वायररची पालक कंपनी अमेरिकन मिडीया इंकचे मालक डेव्हिड पेकर हे ट्रम्प यांचे चांगले मित्र आहेत.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पDivorceघटस्फोट