शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यजनक! इरमा चक्रीवादळामुळे फ्लोरिडाचे किनारे झाले कोरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 13:49 IST

कॅटरिनाप्रमाणे शक्तीशाली असणाऱ्य़ा इरमासारख्या वादळांमध्ये तात्कालिक आणि कायमचे बदल घडवून आणण्याची शक्ती असते. त्यातीलच एक तात्पुरता परिणाम अमेरिकेच्या पूर्वकिनाऱ्यांवर दिसून येत आहे.

ठळक मुद्दे या वादळाचा मोठा तडाखा टाम्पा बे एरियाला बसला आहे.या परिसरामध्ये 30 लाख लोक राहतात. 1921 पासून टाम्पा बे एरियाला वादळाचा तडाखा बसला नव्हता. आता जवळजवळ साडेनऊ दशकांनंतर पुन्हा इतकी मोठी हानी होण्याची वेळ आली आहे.

फ्लोरिडा, दि.11- अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आलेल्या इरमा चक्रीवादळामुळे किनाऱ्यावरील पाणीच मागे गेल्याच्या घटना घडत आहेत. कॅटरिनाप्रमाणे शक्तीशाली असणाऱ्य़ा इरमासारख्या वादळांमध्ये तात्कालिक आणि कायमचे बदल घडवून आणण्याची शक्ती असते. त्यातीलच एक तात्पुरता परिणाम अमेरिकेच्या पूर्वकिनाऱ्यांवर दिसून येत आहे. या वादळांमध्ये एका जागेचे पाणी पूर्ण शोषून शेकडो मैल दूर अंतरावर घेऊन जाण्याचीही ताकद असते. फ्लोरिडाच्या किनाऱ्यांवर असेच बदल दिसून येत आहे. समुद्राचे पाणी नेहमीच्या जागेपेक्षा काही मैल मागे गेल्याचे धक्कादायच चित्र येथे दिसत आहे. अशा घटना अत्यंत दुर्मिळ असतात. फॉरेवर फ्लरिश नावाच्या ट्वीटर हॅंडलवरुन याचा व्हीडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर काही क्षणांत त्याचे हजारो रिट्विटस होऊ लागले. तसेच थोड्याच वेळात त्याची माहिती सर्वदूर पसरू लागली.

इरमा वादळामुळे 10 कॅरेबियन देश तसेच अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याला  सर्वाधीक तडाखा बसलेला आहे. सध्या वाऱ्याचा वेग 137 किमी प्रती तास झाल्यानंतर या वादळाची वर्गवारी 3 मधून वर्गपर्यंत कमी करण्यात आली आहे. या वादळामुळे 34 लाख घरांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. तसेच मायामीमधील बरेच भाग पाण्याखाली गेले आहेत. या वादळामुळे आतापर्यंत 28 जणांचे प्राण गेल्याचे नोंदवण्यात आले आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडाला आणीबाणी पातळीवर सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले असून या वादळाचे वर्णन त्यांनी बिग मॉन्स्टर असे केले आहे. या वादळाचा मोठा तडाखा टाम्पा बे एरियाला बसला आहे. या परिसरामध्ये 30 लाख लोक राहतात. 1921 पासून टाम्पा बे एरियाला वादळाचा तडाखा बसला नव्हता. आता जवळजवळ साडेनऊ दशकांनंतर पुन्हा इतकी मोठी हानी होण्याची वेळ आली आहे.