शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यजनक! आई-वडिल आणि ७ मुलांचा वाढदिवस एकाच दिवशी, गिनीज बुकात विशेष नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 11:20 IST

पती-पत्नी आणि त्यांची ७ मुले एकाच दिवशी आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करतात

लाहोर - पाकिस्तानच्या लरकाना येथील एका कुटुंबाने वेगळाच रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे हा रेकॉर्ड कर्तृत्वापेक्षा नशिबानेच झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणूनच, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांची स्टोरी शेअर केलीय. ९ सदस्य असलेल्या या कुटुंबातील एक गोष्ट एकसमान आहे, ती म्हणजे सर्वांचा वाढदिवस एकाचदिवशी आहे. या कुटुंबातील सर्वच सदस्य १ ऑगस्ट रोजी जन्माला आले आहेत. त्यामुळे, या सगळ्यांचा वाढदिवस एकाच दिवशी कुटुंबात साजरा होतो. 

पती-पत्नी आणि त्यांची ७ मुले एकाच दिवशी आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करतात. सर्वजण वेगवेगळ्या वर्षी जन्माला आले, पण त्याची जन्मतारीख आणि महिना एकच आहे. त्यामुळे, हा आता विश्वविक्रम बनला आहे. कारण, कुठल्याही कुटुंबातील एवढ्या सदस्यांचा जन्मदिवस एकाच दिवशी असल्याचे दुसरे उदाहरण नाही. यापूर्वी अमेरिकेतील कमिंस कुटुंबाच्या नावावर हे रेकॉर्ड होते, त्यांचा जन्मदिवस १९५२ आणि १९६६ साली झाला असून त्यांची जन्मतारीख २० फेब्रुवारी ही आहे. 

दरम्यान, आमीर आणि खुदेजा यांच्यासाठी १ ऑगस्ट ती तारीख आणखी स्पेशल आहे, कारण याच दिवशी दोघांचं लग्न झालं होतं. म्हणजे, दोघांच्या लग्नाचा वाढदिवसही याचदिवशी येतो. आपल्या सर्वात मोठ्या मुलीच्या जन्माच्या १ वर्ष अगोदर म्हणजेच १९९१ साली स्वत:च्या वाढदिवसादिवशी लग्न केले होते. त्यानंतर, १ ऑगस्ट १९९२ साली दोघांना पहिली मुलगी झाली, तिचं नाव सिंधु ठेवण्यात आलं. विशेष म्हणजे सिंधुंच्या जन्मावेळीच या दाम्पत्यास आश्चर्य आणि आनंद झाला होता. पण, त्यानंतर, त्यांच्या प्रत्येक मुलांचा जन्म हा १ ऑगस्ट या दिवशीच झाला. त्यामुळे, ही सर्व देवाची कृपा असल्याचं आमीर आणि खुदेजा म्हणतात. 

आमीर आणि खुदेजा यांची त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबतचे फोटो सध्या सोशल मीडियातून समोर आले आहेत.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Viralसोशल व्हायरलBabys Day Outबेबीज डे आऊट