शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:06 IST

पाकिस्तान चीनकडून J-35A ही ४० लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. याबाबतची माहिती पाकिस्तानच्या बजेटमधून समोर आले आहे.

पाकिस्तान गेल्या काही वर्षापासून आर्थिक संकटात आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे, पाकिस्तानमधील जनताही महागाईमुळे त्रस्त आहे. या महागाईमधून जनतेला बाहेर काढण्यासाठी पाकिस्तानने आयएमएफकडून मदत घेतली आहे. दरम्यान, आता आधीच कर्जामध्ये असलेला पाकिस्तान आणखी कर्जात बुडणार असल्याचे दिसत आहे. पाकिस्तान चीनकडून स्टेल्थ फायटर J-35A ही लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. यामुळे आता कर्जात आणखी वाढ होणार आहे. पाकिस्तानच्या अर्थसंकल्पामधून ही माहिती उघड झाली आहे. 

पाकिस्तान चीनकडून अत्याधुनिक पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर J-35A खरेदी करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. पाकिस्तानने आपल्या संरक्षण बजेटमध्ये २०% वाढ केली आहे, या अंतर्गत २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी २,५५० अब्ज रुपये वाटप करण्यात आले आहे. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे चीनकडून ४० अत्याधुनिक J-35A स्टेल्थ फायटर जेट खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. 

पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव होता. यावेळी दोन्ही देशांमध्ये हल्ले-प्रतिहल्ले झाले. या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानने संरक्षणावर खर्च वाढवला आहे. तर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या एअर फोर्सचे मोठे नुकसान केले आहे, यामुळे पाकिस्तान एअर फोर्सवर मोठा खर्च करत आहे. 

40 J-35A स्टेल्थ लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी चर्चा

पाकिस्तान चीनकडून 40 J-35A स्टेल्थ लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे आणि त्यांची डिलिव्हरी ऑगस्टपासून सुरू होऊ शकते. J-35A हे दोन इंजिन असलेले मल्टीरोल लढाऊ विमान आहे. हे PL-17 क्षेपणास्त्रे आणि अत्याधुनिक AESA रडार प्रणालींनी सुसज्ज आहे. पाकिस्तानी हवाई दलाने या कराराला आधीच मान्यता दिली आहे, वैमानिकांना चीनमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.

या करारात चीनने पाकिस्तानला ५०% पर्यंत सूट आणि लवचिक पेमेंट पर्याय दिले आहेत. सध्या, पाकिस्तानची सुमारे ८०% शस्त्रे चीनकडून येतात. भारतासोबतच्या अलिकडच्या लष्करी संघर्षात पाकिस्तानने J-10C लढाऊ विमान आणि HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली सारखी शस्त्रे वापरली होती.

आर्थिक संकटादरम्यान लष्करी खर्चावर प्रश्न 

पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. पाकिस्तानवर आधीच चीनकडून १५ अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. याशिवाय, पाकिस्तान आयएमएफकडून ६-८ अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजची मागणी करत आहे. एकूण २६९ अब्ज डॉलर्सचे कर्ज असलेला हा देश कर्ज फेडण्यासाठी त्याच्या जीडीपीच्या १.९% पेक्षा जास्त खर्च करत आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीन