शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Alice Sebold Rape Case: बलात्काराच्या घटनेवर पुस्तक लिहून फेमस झाली महिला; निर्दोष 16 वर्षे तुरुंगात सडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 18:19 IST

Alice Sebold Rape Case: कथित पीडिता एलिस सेबोल्डने बलात्काराच्या घटनेवर पुस्तक लिहिले आणि ते बेस्टसेलर देखील झाले. यामुळे लेखिका फेमस झाली. पण कथित आरोपी जेलमध्ये निर्दोष असल्याचे ओरडत होता.

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये बलात्काराच्या एका कथित गुन्ह्यात एका व्यक्तीला 16 वर्षे तुरुंगात रहावे लागले. त्याला बलात्कार प्रकरणी दोषी मानण्यात आले होते. मात्र, तो नेहमी म्हणत होता की त्याने बलात्कार केलेला नाही. अखेर 16 वर्षांची शिक्षा भोगून झालेल्या कथित आरोपीला न्यूयॉर्कच्या सर्वोच्च न्यायालयाने आरोपातून मुक्त केले. दुसरीकडे कथित पीडितेने एलिस सेबोल्डने बलात्काराच्या घटनेवर पुस्तक लिहिले आणि ते बेस्टसेलर देखील झाले. यामुळे लेखिका फेमस झाली. 

61 वर्षीय अँथनी ब्रॉडवाटरला न्याय मिळाला. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अँथनी यांनी सतत मी 'द लवली बोन्स'ची लेखिका एलिस सेबोल्डवर बलात्कार केला नाही, असेच सांगत होता. सेबोल्डने लवलीमध्ये आरोप केला होता की अँथनीने तिच्यावर बलात्कार केला आहे. अंथनीच्या वकिलांनी सांगितले की, 16 वर्षे तो तुरुंगात राहिला. कमीत कमी पाचवेळा त्याला पेरोलपासून वंचित ठेवण्यात आले. कारण एकच तो त्याचा गुन्हा स्वीकारत नव्हता. यामुळे त्याला तुरुंगातच ठेवण्यात आले.

ब्रॉडवाटरने दोनदा लाय डिटेक्टर टेस्ट देखील पास केली होती. 1981 मध्ये सेबोल्डवर कथित बलात्कार झाला होता. 1999 मध्ये त्याची शिक्षा पूर्ण झाली. अँथनीने झालेल्या शिक्षेविरोधात पाचवेळा अपील केले होते. अखेर गेल्या आठवड्यात त्याला त्याच्या आरोपांतून मुक्त करण्यात आले. नेटफ्लिक्सनेही तिच्या पुस्तकावर फिल्म बनविली होती. या निकालानंतर ती काढून टाकण्यात आली आहे. 

पाच महिन्यांनी सेबोल्डने अँथनीला पाहिलेले...बलात्काच्या जवळपास पाच महिन्यांनी सेबोल्डने रस्त्यावर अँथनीला पाहिले होते. जेव्हा त्याला पाहिले तेव्हा तिला कथित बलात्कार करणाऱ्या व्यक्तीची आठवण आली. मात्र, ती पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये त्याला ओळखण्यात फेल झाली. तरीही अँथनीला दोषी ठरविण्यात आले. 

टॅग्स :Americaअमेरिका