शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीमुक्त परीक्षेसाठी थांबवलं इंटरनेट, संपूर्ण देश झाला ऑफलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 11:40 IST

देशात सर्व केंद्रांवर मोबाइल फोन जॅमर आणि सीसीटीव्ही लावल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

अल्जायर्स- परीक्षांमध्ये कॉपी होऊ नये, मुलांना कोणत्याही प्रकारे बाहेरुन मदत मिळू नये यासाठी धडपडणारी परिक्षा मंडळं आपण पाहिली असतील. तसेच या शाळेतून त्या शाळेत जाणाऱ्या भरारी पथकांच्या बातम्याही आपल्या कानावर आलेल्या असतात. पण एका देशाने कॉपी थांबविण्यासाठी संपूर्ण देशातील इंटरनेटच बंद केलं. अल्जेरियामध्ये हायस्कूल डिप्लोमाच्या परिक्षा सुरु झाल्यावर मुलांना कोणत्याही प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉपी करता येऊ नये यासाठी संपूर्ण देशाचे इंटरनेटच बंद करण्यात आले.  इंटरनेट, मोबाइल फोन तसेच इतर उपकरणांचा वापर करुन कॉपी केली जाते तसेच व्हॉटसअॅपचाही वापर करुन पेपर, उत्तरे पसरवली जातात. त्यामुळे या समस्येला थांबविण्यासाठी अल्जेरियाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.

मोबाइल आणि इतर सेवांमधील इंटरनेट काल दोन तासांठी थांबविण्यात आले होते. हायस्कूल डिप्लोमा चाचणी परीक्षा व्यवस्थित व्हावी यासाठी इंटरनेट बंद ठेवण्याच्या सूचना सरकारतर्फे करण्यात आली होती असं अल्जेरिया टेलिकॉमने स्पष्ट केलं आहे. जवळजवळ 7 लाख मुले विविध प्रकारच्या परीक्षा देत आहेत, त्यामुळे या काळामध्ये इंटरनेट सेवा अशीच खंडीत केली जाऊ शकते असेही सांगण्यात येते.कॉपी थांबविण्यासाठी अल्जेरियातील 2000 पेक्षा जास्त केंद्रांवर मोबाइल आणि टॅबलेटसारख्या वस्तू आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. गेल्या वर्षी परीक्षा काळात सोशल मीडिया थांबविण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र त्यामुळे कॉपीची समस्या प्रश्न सुटण्यास मदत झाली नाही. अल्जेरियाचे शिक्षणमंत्री नुरिया बेंन्घारीट यांनी सर्व परीक्षाकेंद्रांच्या प्रवेशद्वारांजवळ मेटल डिटेक्टर आणि मोबाइल फोन जॅमर लावल्याचे तसेच सर्वत्र क्लोज सर्किट कॅमेरे लावल्याचे सांगितले.

 

टॅग्स :examपरीक्षाInternetइंटरनेटInternationalआंतरराष्ट्रीय