लंडन : तंत्रज्ञानाच्या युगात मुलांच्या हातात आता साधी खेळणी राहिली नसून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित खेळणी येत आहेत. मात्र, ही स्मार्ट खेळणी मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांच्या जडणघडणीसाठी घातक ठरू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अशा खेळण्यांच्या वापराबाबत आता कडक नियम बनविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
हे वरवर सामान्य वाटत असले तरी, ही खेळणी मुलांच्या खऱ्या भावना समजून घेण्यात अपयशी ठरतात. वापरकर्त्या मुलांच्या पालकांनी याकडे वेळीच लक्ष पुरवणे गरजेचे आहे.
मनोवैज्ञानिक सुरक्षेचा मोठा प्रश्नसंशोधक डॉ. एमिली गुडेकर यांच्या मते, ही एआय खेळणी मुलांच्या भावनांचा चुकीचा अर्थ लावू शकतात. अशा स्थितीत मुले पालकांपासून दुरावण्याची शक्यता असते, कारण पालकांच्या अनुपस्थितीत ही खेळणी त्यांना दिलासा देऊ शकत नाहीत. प्रो. जेनी गिब्सन यांनी नमूद केले की, आता मुलांच्या ‘मनोवैज्ञानिक’ सुरक्षेचा विचार करणे अधिक महत्त्वाचे झाले आहे.
कोणती खेळणी? मार्केटमध्ये सध्या ‘गॅबो’ नावाचा एक टेडी बिअर चर्चेत आहे, जो अमेरिकन कंपनी ‘क्यूरियो’ने तयार केला आहे. त्यात ‘ओपन एआय’चा चॅटबॉट वापरण्यात आला आहे, ज्यामुळे तो मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधू शकतो.मात्र, तंत्रज्ञानातील या प्रगतीमुळे मुलांच्या नैसर्गिक विकासावर व त्यांच्या सामाजिक वर्तणुकीवर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मुलांच्या भावनिक प्रश्नांवर मिळते ‘विचित्र’ उत्तरकेंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी लहान मुलांवर होणाऱ्या या खेळण्यांच्या परिणामांचा अभ्यास केला. तपासात असे समोर आले की, ही खेळणी लहान मुले व मोठ्यांच्या आवाजात फरक करू शकत नाहीत.
अनेकदा ही खेळणी मुलांचे बोलणे मध्येच तोडतात व त्यांच्या भावनिक प्रश्नांवर विसंगत किंवा चुकीची उत्तरे देतात. उदा., तीन वर्षांच्या मुलाने खेळण्याला “मी उदास आहे” असे सांगितले, तेव्हा खेळण्याने “चिंता करू नकोस, चल बोलूया” असे उत्तर दिले.
Web Summary : Experts warn AI toys can negatively impact children's mental health and development. These toys often misunderstand emotions, potentially distancing children from parents. Stricter regulations are urged to protect children's psychological safety, especially with toys like the 'Gabo' bear.
Web Summary : विशेषज्ञों का चेतावनी है कि एआई खिलौने बच्चों के मानसिक स्वास्थ्य और विकास पर नकारात्मक प्रभाव डाल सकते हैं। ये खिलौने अक्सर भावनाओं को गलत समझते हैं, जिससे बच्चे माता-पिता से दूर हो सकते हैं। 'गैबो' भालू जैसे खिलौनों के साथ बच्चों की मनोवैज्ञानिक सुरक्षा के लिए सख्त नियमों का आग्रह किया गया है।