शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘एआय’ने केली भविष्यवाणी; कसा असेल पृथ्वीवरील ‘लास्ट सेल्फी’? भयावह फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 05:57 IST

पृथ्वीवरील अखेरचे सेल्फी असेच असतील, यानंतर जगाचा अंत होईल, असे भाकीत DALL-E 2 ने वर्तविले आहे. परंतु, या दाव्यावर अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.  

लोकमत न्यूज नेटवर्कलंडन : जगाचा अंत झाला तर ते कसे दिसेल? यावर अनेकदा चर्चा होत असते आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)ने जगाचा अंत होण्यापूर्वी पृथ्वीवरील ‘शेवटचा सेल्फी’ कसा असेल, याची झलक दाखवली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रतिमा बनविणाऱ्या DALL-E 2 ने जनरेट केलेल्या ‘सेल्फी’मध्ये पृथ्वीवर सर्वत्र विनाश आणि विकृत चेहऱ्यांचे लोक सेल्फी घेताना दिसतात. हे भयावह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

‘रोबोट ओव्हरलोड्स’ नावाच्या टिकटॉक अकाऊंटवरुन DALL-E 2 ला पृथ्वीवरील अखेरचा सेल्फी कसा दिसेल, याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘एआय’ने अनेक प्रतिमा बनवल्या. प्रत्येक प्रतिमेत स्वतःच्या चेहऱ्यासमोर फोन धरलेली एक व्यक्ती आणि त्यांच्या मागे जगाचा अंत होताना दिसतो. 

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियानेटकऱ्यांमध्ये या ‘लास्ट सेल्फी’बाबत प्रचंड चर्चा रंगली असून, काहीजण यावरून मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. तर, काही नेटिझन्सनी या प्रतिमांना ‘मी पाहिलेली सर्वात भयानक गोष्ट’ असे म्हटले. दुसरीकडे  अनेकजण DALL-E 2 च्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित करत आहेत. ‘एआय’चे ‘जगाच्या समाप्ती’बाबतचे विचार आणि अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे देण्याची पद्धत यावरून नेटकरी आपापली मते मांडत आहेत.

सर्वत्र विनाश, आकाशातून बॉम्ब पडण्याची दृश्ये, आगीमुळे बेचिराख झालेली शहरे आणि यादरम्यान हाडांचा सापळा झालेले किंवा ‘झोम्बी’प्रमाणे दिसणारे लोक सेल्फी घेत आहेत. पृथ्वीवरील अखेरचे सेल्फी असेच असतील, यानंतर जगाचा अंत होईल, असे भाकीत DALL-E 2 ने वर्तविले आहे. परंतु, या दाव्यावर अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.  

कायआहेDALL-E 2?या वर्षाच्या सुरूवातीलाच DALL-E 2 ही एआय प्रणाली विकसित करण्यात आली असून, संकेतस्थळावरील दाव्यानुसार ही प्रणाली वापरकर्त्याने केलेल्या वर्णनावरून “वास्तववादी प्रतिमा तयार करू शकते”.