शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

लंडनमध्ये अग्नितांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 04:00 IST

लंडनमध्ये २४ मजली निवासी संकुलाच्या इमारतीला बुधवारी लागलेल्या अतिशय भीषण अशा आगीत १२ जण ठार, तर ७४ जण जखमी झाल्याचे जाहीर झाले असले, तरी मृतांची

लंडन : लंडनमध्ये २४ मजली निवासी संकुलाच्या इमारतीला बुधवारी लागलेल्या अतिशय भीषण अशा आगीत १२ जण ठार, तर ७४ जण जखमी झाल्याचे जाहीर झाले असले, तरी मृतांची संख्या खूपच मोठी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जखमींपैकी २० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. इंग्लडमध्ये गेल्या तीन दशकांतील आगीची ही सर्वात भीषण घटना आहे. लँकेस्टर वेस्ट इस्टेटमधील लॅटिमेर रस्त्यावरील ग्रेनफेल टॉवरला स्थानिक वेळेनुसार पहाटे १.१६ मिनिटांनी आग लागली. ही २४ मजली इमारत सध्याही आगीने वेढलेली असून ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत जाऊ न आग विझविणे आणि अडकलेल्यांना बाहेर काढणे अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस यांना शक्य झालेले नाही.. सुमारे २०० अग्निशामक, ४० फायर ट्रक्स, २० रुग्णवाहिका घटनास्थळी उपस्थित होत्या. या इमारतीला नवे रूप देणे व नूतनीकरणावर १०.३ दशलक्ष पौंड खर्च करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अग्निशामक दलांनी अनेक लोकांना वाचवले. लोक जळत्या इमारतीत मदतीसाठी किंचाळत होते आणि आमच्या मुलांना वाचवा, असे ओरडताना दिसत होते. काही रहिवासी इमारतीतून बाहेर पडण्यासाठी चादरींचा वापर करताना दिसले. बाळ झेललेअग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवण्यात गुंतलेले असताना नवव्या मजल्याच्या खिडकीतून खाली सोडलेले बाळ लोकांनी झेलले. सर्वात मोठी आगमाझ्या २९ वर्षांच्या सेवेत अशी भीषण आग मी कधी बघितली नाही, असे लंडन अग्निशमन तुकडीचे प्रमुख डॅनी कॉटन म्हणाले. तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावरील सदोष रेफ्रीजरेटरमुळे मध्यरात्री आग लागल्याचे सांगितले जाते. तिने फ्लॅटमागून फ्लॅट नष्ट केले. मात्र पोलिसांनी आगीचे नेमके कारण स्पष्ट व्हायला काही वेळ लागेल, असे म्हटले जात आहे.