शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारतविरोध भोवला, मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्षांविरुद्ध महाभियोग येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 06:35 IST

Maldives: मालदीवच्या संसदेत बहुमत असलेला प्रमुख विरोधी पक्ष एमडीपी, अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्यावर महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. मोइझ्झू यांच्या मंत्रिमंडळात तीन सदस्यांना घेण्यास सोमवारी संसदीय मतदानादरम्यान मंजुरी नाकारण्यात आली, असे वृत्त आहे.

माले : मालदीवच्या संसदेत बहुमत असलेला प्रमुख विरोधी पक्ष एमडीपी, अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्यावर महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. मोइझ्झू यांच्या मंत्रिमंडळात तीन सदस्यांना घेण्यास सोमवारी संसदीय मतदानादरम्यान मंजुरी नाकारण्यात आली, असे वृत्त आहे.

चीन समर्थक राष्ट्राध्यक्षांच्या मंत्रिमंडळातील चार सदस्यांना मंजुरी देण्यावरून सरकार समर्थक खासदार आणि विरोधी खासदार यांच्यात रविवारी संसदेत संघर्ष सुरू झाल्यानंतर या घडामोडी घडल्या. 

“एमडीपीने  डेमोक्रॅट्सच्या सहकार्याने महाभियोग प्रस्तावासाठी पुरेशा स्वाक्षऱ्या गोळा केल्या आहेत. तथापि, त्यांनी तो अद्याप सादर केला नाही,” असे वृत्त एमडीपीमधील एका खासदाराचा हवाला देत सन डॉट कॉमने दिले आहे. सोमवारी झालेल्या एमडीपीच्या संसदीय गटाच्या बैठकीत महाभियोग प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

सभापतींच्या कानात वाजविले हॉर्नरविवारी काही खासदारांनी हॉर्न आणले होते. काही खासदार स्पीकरच्या खुर्चीजवळ पोहोचले आणि त्यांच्या कानाजवळ वाजवू लागले. सभापती एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप या खासदारांनी केला.यानंतर मुइझ्झूच्या समर्थक आणि विरोधक खासदारांमध्ये बाचाबाची झाली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

महाभियोगासाठी काय करावे लागेल?- महाभियोगसाठी किमान ५३ मतांची आवश्यकता असेल. त्यानंतरच मुइझ्झू यांना हटवता येईल. त्यामुळे प्रस्ताव मंजूर करून घेणे सोपे नाही. - महाभियोगात तीन गोष्टी स्पष्ट असाव्यात. पहिली- राष्ट्रपतींनी इस्लाम, संविधान किंवा कायद्याच्या विरोधात काहीतरी केले आहे. दुसरे म्हणजे अध्यक्षपद भूषविताना त्यांनी त्याचा गैरवापर केला आहे किंवा स्वत:च्या फायद्यासाठी वापरला आहे. तिसरा आणि शेवटचा म्हणजे घटनेने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत.

टॅग्स :MaldivesमालदीवInternationalआंतरराष्ट्रीय