शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

शिया इस्माइली मुस्लिमांचे धर्मगुरू आगा खान यांचे निधन; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 19:32 IST

आगा खान चतुर्थ यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

Aga Khan IV Passes Away : शिया इस्माइली मुस्लिमांचे 49वे वंशपरंपरागत इमाम प्रिन्स करीम अल-हुसेनी आगा खान चतुर्थ यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी लिस्बन येथील राहत्या घरात त्यांनी अखेरचा स्वास घेतला. प्रिन्स करीम आगा खान हे आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे संस्थापक-अध्यक्ष होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आगा खान यांना श्रद्धांजली वाहिली.

आगा खान यांचा नामनिर्देशित उत्तराधिकारी लवकरच जाहीर केला जाईल. दरम्यान, आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या नेत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे कुटुंब आणि जगभरातील इस्माइली समुदायाप्रती शोक व्यक्त केला आहे. आगा खान ट्रस्टचे सीईओ रितेश नंदा म्हणाले की, आम्ही आमचे संस्थापक प्रिन्स करीम आगा खान यांच्या वारशाचा सन्मान करतो. आम्ही जगभरातील व्यक्ती आणि समुदायांचे जीवनमान सुधारण्यासाठी आमच्या भागीदारांसोबत काम करत राहू. दरम्यान, आगा खान यांच्या संस्थेने शिक्षण, आरोग्य आणि जगभरातील ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व असलेल्या इमारतींच्या संरक्षणासाठी मोठे काम केले आहे.

जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या महंमद साहेबांचे वंशजप्रिन्स करीम अल-हुसेनी आगा खान IV हे जगभरातील लाखो शिया इस्माइली मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते होते. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी त्यांना इस्माइली मुस्लिमांचे 49 वे इमाम आणि आध्यात्मिक नेता बनवण्यात आले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी समर्पित केले आणि प्रत्येकाला मानवतेचा संदेश दिला.

पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानितआगा खान चतुर्थ यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. ब्रिटिश सरकारने त्यांना महामानव ही पदवी दिली होती. त्यांनी स्थापन केलेले आगा खान नेटवर्क जगभरातील 30 देशांमध्ये काम करते, ज्यात एक लाखाहून अधिक लोक काम करतात. ही जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थांपैकी एक आहे. आगा खान ट्रस्टने हुमायून किल्ला, सुंदर नर्सरीसह दिल्लीतील 60 स्मारकांची दुरुस्ती केली. हैदराबादच्या जवळपास 100 स्मारकांची दुरुस्तीही या संस्थेमार्फत करण्यात आली आहे.

वडिलांचा वाडा सरकारला भेट दिला रतीश नंदा सांगतात की, भारताच्या स्वातंत्र्याच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त प्रिन्स करीम आगा खान चतुर्था यांनी हैदराबादमधील त्यांच्या वडिलांचा राजवाडा सरकारला भेट म्हणून दिला होता. हा तोच राजवाडा होता, जिथे एकेकाळी महात्मा गांधींना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर 50 व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी हुमायूनच्या किल्ल्यातील जीर्णोद्धार केलेली बागही भारत सरकारला भेट म्हणून दिली. यानंतर, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त हुमायूं फोर्ट म्युझियम बांधण्यात आले. 2018 मध्येही ते सुंदर नर्सरीच्या उद्घाटनासाठी भारतात आले होते. गेल्या 20 वर्षांत ते सुमारे दहा वेळा भारतात आले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMuslimमुस्लीम