शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Sri Lanka Monkey China: पाकिस्तानच्या गाढवांनंतर आता श्रीलंकेच्या 1 लाख माकडांची खरेदी करतोय चीन, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 00:27 IST

श्रीलंकन सरकारमधील अनेक वरिष्ठ मंत्री चीनला माकडांची निर्यात करण्याच्या बाजूने आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, माकडांमुळे श्रीलंकेतील शेतीचे मोठे नुकसान हेत आहे. यामुळे चीनला 1 लाख माकडांची निर्यात करण्यात काहीच नुकसान नाही.

कोलंबो : पाकिस्तानातून गाढवांची खरेदी करणारा चीन आता श्रीलंकेतून माकडे आयात करण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात चीन आणि श्रीलंका यांच्यात चर्चेच्या तीन फेऱ्याही झाल्या आहेत. पण यावर अद्याप कसल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. श्रीलंकन सरकारमधील अनेक वरिष्ठ मंत्री चीनला माकडांची निर्यात करण्याच्या बाजूने आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, माकडांमुळे श्रीलंकेतील शेतीचे मोठे नुकसान हेत आहे. यामुळे चीनला 1 लाख माकडांची निर्यात करण्यात काहीच नुकसान नाही. कारण या माकडांना पकडण्याचा आणि निर्यातीचा खर्चही चीनच करणार आहे. महत्वाचे म्हणजे, या माकडांना चीन प्राणीसंग्रहालयात ठेवणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र चीनमध्ये माकडाचे मांसही अत्यंत लोकप्रिय आहे.

श्रीलंकन माकडांना प्राणीसंग्रहालयात ठेवणार चीन - बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंकेचे कृषी मंत्री महिंदा अमरवीरा यांनी म्हटले आहे की, चीनमध्ये माकडांची निर्यात करण्यासंदर्भा अद्याप कुठल्याही प्रकारचा अंतिम निर्णय झालेला नाही. चीनने 1 लाख माकडांची निर्यात करण्यासंदर्भात विनंती केली आहे. या माकडांना तेथील एक हजार प्राणिसंग्रहालयांमध्ये ठेवण्याची चीनची इच्छा आहे. दरम्यान, श्रीलंकन कृषी मंत्रालयाचे अधिकारी यासंदर्भात राष्ट्रीय प्राणी संग्रहालय आणि वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका कत आहेत. तसेच, श्रीलंका सरकारने यासंदर्भात एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेतला आहे, जी माकडांच्या निर्यातीशी संबंधित कायदेशीर बाबींवर लक्ष ठेवेल.

माकडाच्या निर्यातीमागील तर्क - श्रीलंकेत माकडांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. गेल्या एका वर्षात माकडांनी सुमारे 2 कोटी नारळांचे नुकसान केले. शेती पिकांचे नुकसान होत असल्याने त्याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बसत आहे. श्रीलंकेत 30 लाखहून अधिक माकडं आहेत. त्यामुळे 1 लाख माकडांची निर्यात केल्याने काहीही नुकसान होणार नाही. असा दावा कृषी मंत्री महिंदा अमरवीरा यांनी केला आहे. ते लवकरच श्रीलंकेच्या मंत्रिमंडळासमोर चीनला माकडांच्या निर्यातीसंदर्भातील प्रस्तावही मांडणार आहे.

टॅग्स :MonkeyमाकडchinaचीनSri Lankaश्रीलंका