पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. ६ आणि ७ मे रोजीच्या रात्री केलेल्या या लष्करी कारवाईनंतर पुढे लष्करी संघर्ष वाढला. दोन-तीन दिवस दोन्ही देशात तणाव प्रचंड वाढला होता. पण, नंतर अचानक शस्त्रसंधी झाली. या शस्त्रसंधीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंडिया टुडे विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने याबद्दलचे वृत्त दिले आहे. सूत्रांनी सांगितले की, भारताने दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानकडून एकदा नव्हे तर दोन वेळा कॉल करण्यात आला होता.
शस्त्रसंधीसाठी पाकिस्तानचे ७ मे रोजीच दोन कॉल
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर ७ मे रोजी सांयकाळीच पाकिस्तानकडून भारताला दोन वेळा कॉल करण्यात आला. हा कॉल शस्त्रसंधी करण्यासंदर्भात होता.
वाचा >>नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक, ओडिशामधील धक्कादायक घटना
पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ यांच्याकडून औपचारिकपणे भारताशी संपर्क करण्यात आला होता. त्यानंतर १० मे रोजी दुपारी ३.३५ वाजता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डीजीएमओ यांच्यात चर्चा झाली होती.
याच चर्चेत दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्यास सहमती दिली. ही शस्त्रसंधी तणाव कमी करण्यासाठी करण्यात आली.
ऑपरेशन सिंदूरमध्ये किती लोकांचा मृत्यू?
भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. याचा आकडा आता समोर आला असून, १६० जणांचा मृत्यू झाला आहे. बहावलपूर येथील हल्ल्यात २० पेक्षा जास्त मारले गेले. हा जैश ए मोहम्मदचा अड्डा होता.
त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यात जो लष्करी संघर्ष झाला. त्यात पाकिस्तानच्या ४० सैनिकांचा मृत्यू झाला. पण, पाकिस्तानने ११ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.