शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 11:56 IST

येत्या २ महिन्यात इस्रायल आणि हमासच्या युद्धाला दोन वर्ष पूर्ण होतील. मागच्या २२ महिन्यांत गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

गाझामधील लोकांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. येत्या २ महिन्यात इस्रायल आणि हमासच्या युद्धाला दोन वर्ष पूर्ण होतील. मागच्या २२ महिन्यांत गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. आतापर्यंत तब्बल ६० हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर, अनेक लोक जखमी झाले आहेत. यातील काही लोकांचा जीव भुकेने गेलाय, तर काही लोक स्फोटात मृत्यूमुखी पडले आहेत. पण गाझामधील मृत्यूची कहाणी इथेच संपत नाही. आता एका अहवालातून असे समोर आले आहे की गाझामध्ये सामान्य आजारही प्राणघातक बनले आहेत.  

नुसताच 'द लॅन्सेट'चा अहवाल समोर आला आहे. अहवालानुसार, गाझामध्ये आता असे आजार पसरत आहेत, जे अँटीबायोटिक्सनेही बरे होत नाहीत. या अहवालात म्हटले आहे की, जर असे झाले तर हे आजार लोकांमध्ये जास्त काळ टिकतील, गंभीर होतील आणि इतरांमध्ये यांचा संसर्ग होऊन मृत्यूचा धोका वाढतच जाईल.

लॅन्सेटचा अहवाल काय म्हणतो?हा अहवाल लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीजेस नावाच्या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासानुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर, पहिल्यांदाच असे समोर आले आहे की गाझामध्ये मल्टी-ड्रग-रेजिस्टेंट जीवाणूंचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. म्हणजेच ते जीवाणू इतके मजबूत झाले आहेत की, औषधे त्यांच्यावर परिणाम करत नाहीत. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे कठीण होते.

आता ही परिस्थिती केवळ गाझाच नाही, तर आज संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनली आहे. लॅन्सेटने या अभ्यासासाठी गाझाच्या अल अहली हॉस्पिटलमधून १३०० हून अधिक नमुने घेतले. बहुतेक नमुने हवाई हल्ल्यात किंवा स्फोटात जखमी झालेल्या लोकांचे होते. यापैकी दोन तृतीयांश नमुन्यांमध्ये असे बॅक्टेरिया होते, जे अनेक प्रकारच्या औषधांनी देखील नष्ट होत नव्हते.

हा धोका वेगाने वाढू शकतो!जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, त्यांना गाझामध्ये वैद्यकीय साहित्याचा साठा करण्याची परवानगी द्यावी, अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल. सध्या, गाझामधील अर्ध्याहून अधिक औषधे संपली आहेत, रुग्णालये २४०% पेक्षा जास्त भरली आहेत आणि फक्त अर्धी रुग्णालये आणि दवाखाने अंशतः कार्यरत आहेत. संशोधन पथकाचे म्हणणे आहे की जर युद्ध, रुग्णालये आणि जलसंयंत्रांवर हल्ले थांबले नाहीत, तर हे औषध-प्रतिरोधक रोग संकट आणखी वेगाने वाढेल.

टॅग्स :Gaza Attackगाझा अटॅकHealthआरोग्य