शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

होय, आम्हाला लादेनच्या वास्तव्याची माहिती होती; पाकिस्तानची पहिल्यांदाच कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 16:16 IST

लादेन प्रकरणात पाकिस्तान तोंडावर आपटला; खान यांच्या विधानामुळे मोठी नामुष्की

वॉशिंग्टन: पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयनं दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार करण्यात अमेरिकेला मदत केली होती, असं पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे. गेल्या आठ वर्षांपासून पाकिस्ताननं लादेनच्या वास्तव्याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती, अशी भूमिका घेतली होती. मात्र आता पाकिस्ताननं पहिल्यांदाच लादेनच्या वास्तव्याची माहिती होती याबद्दल कबुली दिली आहे. यामुळे पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली आहे.पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या इम्रान खान यांनी फॉक्स न्यूजला मुलाखत दिली. लादेनचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरची सुटका करणार का, असा प्रश्न खान यांना मुलाखतीत विचारण्यात आला. यावर हा भावनिक प्रश्न असून पाकिस्तान शकील आफ्रिदीला हेर समजतो, असं उत्तर खान यांनी दिलं. लादेनचा शोध घेण्यासाठी आफ्रिदी वैद्यकीय तपासणी मोहिमेचं कारण देऊन घराघरांना भेटी देत होते. त्यातूनच लादेनचा ठावठिकाणा अमेरिकेला समजला. यानंतर २ ऑक्टोबर २०११ च्या मध्यरात्री अमेरिकेच्या स्पेशल टीमनं लादेनचा खात्मा केला. सध्या आफ्रिदी पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. लादेन प्रकरणावर भाष्य करताना खान यांनी मोठी कबुली दिली. 'ओसामा बिन लादेन लपून बसलेल्या जागेची माहिती आयएसआयनं दिली होती. तुम्ही याबद्दल सीआयएला विचारु शकता. लादेनच्या सुरुवातीच्या ठावठिकाण्याची माहिती आयएसआयकडून देण्यात आली होती,' असा दावा खान यांनी मुलाखतीत केला. खान यांच्या या दाव्यामुळे पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढवली आहे. लादेन पाकिस्तानात नाही, त्याच्या वास्तव्याबद्दल कोणतीही माहिती आमच्याकडे नाही, अशी भूमिका वारंवार पाकिस्ताननं घेतली होती.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानOsama Bin Ladenओसामा बिन लादेनAmericaअमेरिका