शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
7
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
8
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
9
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
10
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
11
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
12
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
13
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
14
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
15
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
16
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
17
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
18
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
19
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
20
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!

धक्कादायक! कोरोनानंतर आता उत्तर कोरियात रहस्यमयी तापाचे थैमान; 21 जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 12:32 IST

North Korea : कोरोना महामारीचा सामना करणाऱ्या उत्तर कोरियामध्ये शुक्रवारी रहस्यमयी तापाने ग्रस्त असलेल्या 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

सियोल - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान पहिल्यांदाच कोरोना महामारीचा सामना करणाऱ्या उत्तर कोरियामध्ये शुक्रवारी रहस्यमयी तापाने ग्रस्त असलेल्या 21 जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्थेने शनिवारी हे वृत्त दिले आहे. नवीन मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत की नाही हे KCNA वृत्तसंस्थेने सांगितले नाही. तथापि, KCNA ने शुक्रवारी पुष्टी केली की मृतांपैकी एकाचा कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन प्रकारामुळे मृत्यू झाला आहे.

KCNA ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या अखेरीपासून देशात तापाने आजारी असलेल्या 2 लाख 80 हजारांहून अधिक लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. तापामुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. KCNA ने सांगितले की, शनिवारी पहाटे सत्ताधारी पक्षाची बैठक झाली, ज्यामध्ये किम जोंग उन देखील उपस्थित होते. या बैठकीत एक अहवाल सादर करण्यात आला, ज्यामध्ये हा आजार देशाच्या स्थापनेनंतरची सर्वात मोठी आपत्ती म्हणून समोर आला असला तरी तो टाळता येऊ शकतो, असं म्हटलं होतं.

सध्या या रहस्यमय़ी तापाचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, ताप येण्यामागे कोरोना हे प्रमुख कारण असावे असा संशय आहे. तत्पूर्वी, उत्तर कोरियाचेकिम जोंग उन यांनी गुरुवारी राष्ट्रीय लॉकडाउन आदेश दिल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी अँटी-व्हायरस कमांड सेंटरला भेट दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. "देशात सर्वात मोठी आपत्कालीन घटना घडली आहे. फेब्रुवारी 2020 पासून दोन वर्ष आणि तीन महिने देशाला सुरक्षित ठेवण्यात यश आलं होतं. पण आता यात घुसखोरी झाली आहे", असं सरकारी माध्यमांनी सांगितलं आहे. 

उत्तर कोरियात आता नेमके किती रुग्ण आढळले आहेत याची माहिती देण्यात आलेली नाही. देशात अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि संपूर्ण जगापासून वेगळं राहण्याच्या आपल्या भूमिकेमुळे किम जोंग चिंतित आहेत. या दोन कारणांमुळे कोरोनाचा वाईट प्रभाव संपूर्ण देशावर पडू शकतो असं किम जोंग यांना वाटतं. कोरोनाला देशाच्या सीमेवरच रोखण्यात यशस्वी झाल्याचा दावा आतापर्यंत उत्तर कोरिया करत आलं होतं. पण आता अधिकृतरित्या कोरोना रुग्ण आढळल्याचं मान्य केल्यानंतर भविष्यात होणाऱ्या घटनाक्रमांवर सर्वांचं लक्ष लागून असणार आहे.

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उन