शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

अमेरिकेने वाळीत टाकले, चीनने WHO साठी अख्खी तिजोरीच खुली केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 11:47 IST

WHO ला एकूण मदतीपैकी १५ टक्के निधी हा अमेरिका देत होती. यामुळे WHO अ़डचणीत आली होती.

कोरोना व्हायरसने अमेरिकेत धुमाकूळ घालायला सुरुवात केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट जागतिक आरोग्य संगटनेलाच जबाबदार धरण्यास सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी WHO चा निधीच रोखला असून चीनवर कारवाई न केल्याने आणि पाठीशी घातल्याचा गंभीर आरोप लावला होता. याला आता चीनने जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. 

WHO ला एकूण मदतीपैकी १५ टक्के निधी हा अमेरिका देत होती. यामुळे WHO अ़डचणीत आली होती. मदत रोखल्याने गरीब देशांना वैद्यकीय पुरवठा ठप्प होण्याची भीती WHO ला होती. आता या संघटनेच्या मदतीला चीन धावून आला आहे. चीनने सांगितले की, कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी चीन WHO ला तीन कोटी डॉलरची अतिरिक्त मदत करणार आहे. याआधी चीनने डब्ल्यूएचओला दोन कोटी डॉलर दिले होते. 

चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले की, चीनने डब्‍ल्‍यूएचओला तीन कोटी डॉलर अतिरिक्त दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम आधी दिलेल्या २ कोटी डॉलरहून अतिरिक्त असणार आहे. हा निधी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी दिला जाणार आहे. विकसनशील देशांची आरोग्य व्यवस्था यामुळे मजबूत होण्यास मदत मिळणार आहे. WHO ही संयुक्त राष्ट्राची संघटना आहे. या संघटनेला मदत करणे म्हणजे चीन सरकार आणि आमच्या नागरिकांचा या संघटनेवर किती विश्वास आहे हे दाखविते. 

काही अमेरिकी खासदारांनी WHO चे अध्यक्ष टेड्रोस यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून टेड्रोस यांनी बुधवारी सांगितले की, अमेरिका WHO ला निधी देण्यात येणारा निधी रोखण्यावर पुनर्विचार करेल अशी आशा आहे. टेड्रोस यांनी लोकांचा जीव वाचविण्यासाठी काम करत राहण्याचे आवाहन केले आहे. 

आणखी वाचा...

सावधान! आता पीएफ अ‍ॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल

मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह

विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात

कोरोनाचे दुष्परिणाम; तब्बल २५ कोटी  बळी जाण्याची भीती 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना