शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्था कमकुवत नसून देशात क्रांती आली आहे; अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 16:05 IST

Afghanistan Crisis : देशाची अर्थव्यवस्था कमकुवत असल्याच्या चर्चो खोट्या असल्याचे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी सांगितले आहे. 

Afghanistan Economic Crisis : अलीकडच्या काळात लागू केल्यामुळे आपल्या महिलाविरोधी धोरणांमुळे तालिबानशासित अफगाणिस्तान चर्चेत आहे. अफगाणिस्तानवर जगभरातून टीका होत आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठे विधान केले आहे.

टोलोन्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानचे विद्यमान परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी दावा केला आहे की, सध्या अफगाणिस्तानमध्ये देशाची अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक कमकुवत झाल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. पण यात काहीही तथ्य नाही. देशातील पैसा युद्ध पुरवठा आणि शस्त्रास्त्रांऐवजी विविध प्रकल्पांसाठी वापरला जात आहे. त्यामुळे पूर्वी चाळीस लाख व्यसनाधीनांना ड्रग्ज देणे यावर अर्थव्यवस्था चालत असल्याचे मानले जात होते. पण आता तसे राहिले नाही.

जगाने घातलेल्या निर्बंधांचा काहीही परिणाम नाही - मुत्ताकी तसेच यापूर्वीची अर्थव्यवस्था देशासाठी फायदेशीर नव्हती. पण आता देशात क्रांती होत असून सध्याच्या अफगाणिस्तान सरकारवर आंतरराष्ट्रीय समुदायाने लादलेल्या निर्बंधांमुळे आणि दबावामुळे देशाचे चलन स्थिर राहिले आहे, अशी कबुली परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून देशाची अर्थव्यवस्था वाढेल, असेही ते म्हणाले.

"अफगाणिस्तानातील नागरिकांच्या पैशाला स्थिरता दिली आहे, सर्व सीमा खुल्या आहेत, कोणीही कुठेही व्यापार करू शकतो, जागतिक स्तरावर निर्बंध आणि दबाव असतानाही अफगाणिस्तानसाठी ही एक मोठी कामगिरी आहे. मात्र, काही जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानवर निर्बंध लादल्याने देशात आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे आगामी काळात संकटाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत सरकारला आपली परराष्ट्र धोरणे सुधारावी लागतील", असेही परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानEconomyअर्थव्यवस्था