शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Kabul Blast : काबूलमधील मशिदीत मोठा स्फोट; 20 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 23:39 IST

Blast in Kabul Mosque: या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून जवळपास 40 जण गंभीर जखमी झाल्याचे बोलले जात आहे.

अफगाणिस्तानातील काबूलमध्ये असलेल्या एका मशिदीत मोठास्फोट झाला आहे. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून जवळपास 40 जण गंभीर जखमी झाल्याचे बोलले जात आहे. काबूलमधील इमरजन्सी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण 27 जणांना तेथे भरती करण्यात आले आहे. यात पाच मुलांचाही समावेश आहे.

या स्फोटानंतर, तालिबानच्या सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसर सील केला असून जखमींना काबूलमधील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काबूल शहरातील सर-ए-कोटल खैरखानामध्ये हा बॉम्बस्फोट झाला. काबूलचा सुरक्षा विभाग खालिद जरदानने या स्फोटाची पुष्टी केली आहे. 

अद्याप कुठल्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. खरे तर, गेल्या काही महिन्यांत असे अनेक हल्ले झाले आहेत, ज्यांत मशिदींनाच निशाणा बनवण्यात आले आहे. मात्र, या हल्ल्यात एक गोष्ट वेगळी आहे. दहशतवादी संघटना आयएस कडून आतापर्यंत शिया मशिदींना निशाणा बनवण्यात येत होते. पण आज ज्या भागात हा स्फोट झाला. त्या भागात शिया समुदाय राहत नाही.

सध्या काबूलमध्ये तालिबानी सरकार आहे. या सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. अशरफ गनी यांना सत्तेवरून हटवून तालिबानने तेथे कब्जा केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही काबूलमध्ये एका मशिदीत स्फोट झाला होता. त्यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच यापूर्वी, अफगाणिस्तानातील गुरुद्वाऱ्यांनाही निशाणा बनवण्यात आले होते.  

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानBlastस्फोटMosqueमशिदterroristदहशतवादी