शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे हाहा:कार! तब्बल ९५० जण मृत्यूमुखी; ६०० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 16:03 IST

अफगाणिस्तानमधील भूकंपाचे हादरे पाकिस्तानातही जाणवले

Afghanistan Earthquake | भारताचे शेजारील राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले. मिळालेल्या माहितीनुसार हे धक्के ६.१ रिश्टर स्केलचे होते. भूकंपामुळेअफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भूकंपामुळे वित्तहानी तर झालीच आहे. पण याशिवाय मोठ्या प्रमाणावर जिवीतहानीही झाली आहे. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत तब्बल ९५० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे. तर सुमारे ६०० लोक हे गंभीर जखमी असल्याचेही सांगितले जात आहे.

अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसले. हे धक्के तीव्र स्वरूपाचे होते. त्यामुळे अफगाणिस्तानच्या ठराविक भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. सुरूवातीला सुमारे २५५ पेक्षाही अधिक लोक मृत्युमुखी पडले असल्याची माहिती असोसिएट प्रेसच्या हवाल्याने ANI ने दिले होती. यूएस जिऑलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात होता. त्यानंतर आता मात्र हा आकडा ९५० पर्यंत पोहोचला आहे. आणि मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

पाकिस्तानातही जाणवले भूकंपाचे धक्के

पाकिस्तानी मीडियानुसार, इस्लामाबादसह इतर शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या आधी शुक्रवारीही पाकिस्तानमध्ये भूकंप झाला होता. त्यानंतर इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतानमध्ये हे धक्के जाणवले. फैसलाबाद, अबोटाबाद, स्वात, बुनेर, कोहाट आणि मलकांडी येथेही हे धक्के जाणवले. दरम्यान, भूकंप किती भीषण याबाबत कमाल तीव्रता अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. तथापि, रिश्टर स्केलवर ७.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप मध्यम धोकादायक मानला जातो. या स्केलवर 2 किंवा त्यापेक्षा कमी तीव्रतेच्या भूकंपाला सूक्ष्म भूकंप म्हणतात, जो बहुतेक जाणवत नाही. तर ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे घरांचे नुकसान होऊ शकते.

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानEarthquakeभूकंप