शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अफगाणिस्तानात हाहाकार : प्रलयंकारी भूकंपात १ हजार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 07:30 IST

Afghanistan earthquake : अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पक्तिका प्रांतात बुधवारी पहाटे जोरदार भूकंप झाला. रिश्टर स्केलवर ६.१ अशी नोंद झालेल्या या प्रलयंकारी भूकंपात एक हजारांहून अधिक अफगाणी नागरिक मृत्यूमुखी पडले.

काबूल : अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पक्तिका प्रांतात बुधवारी पहाटे जोरदार भूकंप झाला. रिश्टर स्केलवर ६.१ अशी नोंद झालेल्या या प्रलयंकारी भूकंपात एक हजारांहून अधिक अफगाणी नागरिक मृत्यूमुखी पडले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली अवघ्या दहा किमी अंतरावर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अफगाणिस्तानातील हा गेल्या दोन दशकांतील सर्वात विध्वंसक भूकंप आहे. पाकिस्तानी सीमेला लागून असलेला पक्तिका प्रांत पहाडी प्रदेश आहे. या भागातील खोस्त शहरापासून ५० किमी अंतरावर नैऋत्येला भूकंपाचा केंद्रबिंदू होता. पक्तिका प्रांतात बहुतांश घरे दगड-विटांचे आहेत. त्यामुळे भूकंपाचा धक्का बसताच अनेक घरे जमीनदोस्त झाली. मातीच्या ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकले असल्याची भीती आहे. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. 

पाकिस्तान आणि भारतातही जाणवले भूकंपाचे हादरे भूकंपाचे वृत्त समजताच तालिबानी सरकारने आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर पाठवली. मात्र, मदत अपूर्ण पडत असल्याचे चित्र आहे. अनेक जण मदतीच्या प्रतीक्षेत असल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली. युरोपियन भूगर्भशास्त्र संस्थेनुसार भूकंपाचे हादरे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतातही जाणवले.

भारत मदत देण्यास कटिबद्ध...अफगाणिस्तानातील भूकंपात मोठ्या प्रमाणावर झालेल्या जीवितहानीबद्दल भारताने दु:ख व्यक्त केले. संकटाच्या या काळात अफगाणिस्तानच्या लोकांंना मदत देण्याप्रति भारताने कटिबद्धता व्यक्त केली. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट केले की, अफगाणिस्तामधील विध्वंसक भूकंपग्रस्तांच्या दु:खात भारत सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो.

यापूर्वीही झाले होते भयावह भूकंपnअफगाणिस्ताचा ईशान्य भाग आणि उत्तर पाकिस्तान येथे २०१५ मध्ये झालेल्या भूकंपात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. n१९९८ मध्ये अफगाणिस्तानच्या ईशान्य भागात झालेल्या ६.१ तीव्रतेच्या भूकंपात ४,५०० जण मृत्यूमुखी पडले होते.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानEarthquakeभूकंपInternationalआंतरराष्ट्रीय