शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मोठी बातमी: अफगाणिस्तानची तालिबानवर सर्वात मोठी कारवाई; एअरस्ट्राइकमध्ये 254 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 14:01 IST

वेगवेगळ्या एअरस्ट्राइकमध्ये अफगाणिस्तानने जवळपास 254 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे तर जवळपास 97 दहशतवादी जखमी झाल्याचे बोलले जाते. (Afghanistan airstrike on taliban terrorists)

अफगाणिस्तान एअरफोर्सने तालिबानवर मोठी कारवाई केली आहे. वेगवेगळ्या एअरस्ट्राइकमध्ये अफगाणिस्तानने जवळपास 254 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे तर जवळपास 97 दहशतवादी जखमी झाल्याचे बोलले जाते. अफगाण सैनिकांनी 24 तासांत काबूल, कंदहार, कुंदूज, हेरात, हेलमंद आणि गझनीसह दहशतवाद्यांच्या एकूण 13 ठिकानांवर एअरस्ट्राइक केले. (Afghanistan airforce airstrike on taliban terrorists 254 killed)

तालिबानी दहशतवाद्यांवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई -सांगण्यात येते, की अफगाणिस्तानने तालिबानी दहशतवाद्यांवर केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात भरलेले एक वाहन उडवण्यात आले. यादरम्यान अफगाण सैनिकांनी 13 आयईडीही डिफ्यूज केले. कालही अफगाणिस्तानच्या हवाई दलाने कंदहार येथील तालिबानी दहशतवाद्यांच्या बंकर्सना निशाणा केले होते. या कारवाईत 10 हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.

अमेरिकेचे अफगाणिस्तानात जबरदस्त बॉम्ब हल्ले; उद्धवस्त केले तालिबानचे अड्डे

वेगाने पाय पसरत चाललाय तालिबान - अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी परतत असतानाच, तेथे पुन्हा एकदा तालिबानी दहशतवाद्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. गेल्या काही आठवड्यात तेथे दहशतवादी हल्लेही वाढले आहेत. तालिबानने अफगाणिस्तानच्या मोठ्या भूभागावर कब्जा करायला सुरुवात केली आहे. अनेक शेजारील देशांना लागून असलेल्या सीमेवरही त्यांनी नियंत्रण मिळवे आहे. तसेच अनेक प्रांतांच्या राजधान्यांवरही तालिबान कब्जा करण्याची भीती आहे. अमेरिकन-नाटो सैनिकांचे परतण्याचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. 31 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होईल.

85 भागांवर कब्जा मिळवल्याचा तालिबानचा दावा -काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील ८५ भागांवर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबानने केला होता. पूर्वी कंदहार हेच तालिबानचे मुख्यालय होते. त्यामुळे उत्तर अफगाणिस्तानसह कंदहारमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.

अफगाणिस्तानमध्ये शंभरावर नागरिकांची गोळ्या घालून हत्या

24 हजार तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मागेल्या चार महिन्यात 5 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, अफगाण सुरक्षा दलाच्या कारवाईत जवळपास 24 हजार तालिबान दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अफगाणिस्तान सरकारने ही माहिती दिली. तालिबानने अफगाणिस्तानमधील विविध भागांमध्ये 22 हजार हल्ले केले. तसेच मॉस्कोमधील तालिबानी शिष्टमंडळाने अफगाणिस्तानच्या 398 जिल्ह्यांपैकी 250 जिल्हे ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.  

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानterroristदहशतवादीairforceहवाईदल